शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खारपानातील ५० हजार हेक्टर पीक पाण्याखाली

By admin | Updated: September 8, 2014 23:28 IST

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी सावरला असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अंदाजे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील

संदीप मानकर - दर्यापूरजुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी सावरला असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अंदाजे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. शेतात पावसाचे पाणी साचले असून सोयाबीन व कपाशीचे पीक पिवळे पडत आहेत. नाजूक असलेल्या तुरीच्या पिकांची मुळे कुजत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अमरावती, भातकुली, दर्यापूर, अचलपूर व अंजनगाव तालुक्यांचा काही भाग हा खारपाणपट्ट्यांचा आहे. येथे काळी जमीन असल्यामुळे येथील जमिनीला थोड्या मुरत्या पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा एकाच वेळी अतिवृष्टी झाल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. २० जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवशी २४० मि.मी. पावसाची नोंद झाली. आधी जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाच्या पिकांची दुबार, तिबार पेरणी करून शेतकरी हवालदिल झाला होता. नंतर अतिवृष्टीने मुगाचे पीक गेले. शासकीय अहवालानुसार ५ हजार २६२ हेक्टरच्या नुकसानीचा सर्व्हे झाला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुन्हा सर्वेक्षण करून ३ हजार ९०६ हेक्टर पिकांंचे नुकसान व नदीकाठची ४०० हेक्टर शेती खरडून गेल्याचा अहवाल पाठविण्यात आला. परंतु हा सर्वे चुकीचा असल्याची ओरड शेतकऱ्यांची असून नुकसानीचा आकडा हजारो हेक्टरचा आहे. परंतु उर्वरित पिके शेतकऱ्यांच्या तोंडाशी आली असताना पुन्हा पावसाने आठवडाभरापासून थैमान घातले. ७ सप्टेंबर रोजी ६८.६७ मि.मी. पाऊस कोसळला आहे. दोन दिवसांत ९० मि.मी. पावसाची नोंद आहे. ८ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात ६२८.११ मि.मी. पाऊस झाला आहे. खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी १७ हजार ९३५ हेक्टरमध्ये मुगाचा पेरा केला होता. परंतु संपूर्ण पीक हातचे गेल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वाधिक कपाशीला पसंती देत कपाशीची २४ हजार ५०४ हेक्टरमध्ये पेरणी, सोयाबीन १७ हजार ९०१ हेक्टर, तूर व इतर १२ हजार ५६ हेक्टर असे एकूण ७२ हजार ३९६ हेक्टरमध्ये पेरणी केली आहे. परंतु दोन दिवसांपासून या परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे ५० हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अशीच परिस्थिती अमरावती व भातकुली तालुक्याची आहे. शेतीची कामे बंद असल्यामुळे कपाशी या पिकांवर मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तर सोयाबीनच्या झाडांची पाने पिवळी पडू लागली आहे.