शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणनगर येथील अनधिकृत बांधकाम पाडले

By admin | Updated: May 15, 2015 00:00 IST

पार्किंगची जागा गिळंकृत : १५ फूट जागेवर अतिरिक्त बांधकाम

अमरावती : बांधकाम परवानगी घेतानाच्या नकाशात पार्किंगची जागा दर्शवून त्यानुसार बांधकाम न करणाऱ्या स्थानिक कल्याणनगर येथील अश्वजित राऊळकर यांच्या मालकीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई गुरुवारी महापालिका पथकाने केली. अनधिकृत बांधकाम मालकाने स्वत: पाडावे, यासाठी आयुक्तांनी नोटीस बजावली होती, हे विशेष.आयुक्त गुडेवार यांनी १० दिवसांपूर्वी चार अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावून हे बांधकाम त्यांनी स्वत: पाडावे, अशा सूचना नोटीसद्वारे केल्या होत्या. मात्र ११ दिवसांचा कालावधी लोटला असताना इमारत मालकांनी ते पाडण्याचे सौजन्य दाखविले नाही. परिणामी गुरुवारी आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना अधिकाऱ्यांना बोलावून पहिल्या टप्प्यात कल्याणनगर येथील अश्वजित राऊळकर यांनी नियमबाह्य उभारलेल्या सदनिका वजा संकुलाचे अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार एडीटीपी, अतिक्रमण विभाग आणि पोलिसांची चमू गुरुवारी दुपारी कल्याणनगर येथे दाखल झाली. बुलडोजर, पोलिसांचा फौजफाटा, कर्मचारी असा लवाजमा बघून परिसरातील नागरिकही अवाक् झालेत. राऊळकर यांनी संकुल वजा सदनिकेसाठी बांधकाम परवानगी घेताना मंजूर नकाशात १५ फुटांची जागा पार्किंगसाठी दर्शविली होती. परंतु प्रत्यक्षात बांधकाम करताना पार्किंगची जागा सोडण्यात आली नाही. या जागेवरच बांधकाम करण्यात आले. याबाबतची तक्रार काही नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी ‘सर्चिंग’ केले. यात चार इमारतींचे अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात राऊळकर यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. येत्या आठवड्यात उर्वरित नियमबाह्य इमारतींवर बुलडोजर चालण्याचे संकेत आहेत. राऊळकर यांनी तळमजल्यावर दुकाने तर वरच्या मजल्यावर सदनिका बांधली होती. त्यांनी पार्किंगच्या जागेवरही बांधकाम केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी अनधिकृत बांधकाम पाडून कारवाईचा श्रीगणेशा केला. ही कारवाई करताना एडीटीपी सुरेंद्र कांबळे, अभियंता हेमंत महाजन, घनश्याम वाघाडे, अजय विंचुरकर, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)