शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वापायी उमेश सोसतोय असह्य वेदना!

By admin | Updated: September 9, 2016 00:37 IST

मुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात,

समाज स्वीकारणार का दायित्व ? : १५ वर्षांपासून मदतीसाठी आईचा आर्त टाहोमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरमुुलाला जत्मत: आलेले अपंगत्व अन् कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, मुलाचं संगोपन करताना कुटुंबाची होत असलेली वाताहात, अपंगत्वापायी मुलाला होत असलेल्या असह्य वेदना, मुलाच्या अपंगत्वापायी आईची झालेली केविलवाणी स्थिती बघितली की, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावल्याशिवाय रहावत नाही. असाच प्रत्यय तालुक्यातील येनस येथील उमेश रघुते नामक युवकाला जन्मताच आलेले अपंगत्व व उमेशच्या उपचारासाठी तसेच संगोपनासाठी कुटुंबाची होत असलेली दाणादान, पैशाअभावी उपचारासाठी आईची शासन दरबारी होत असलेली मदतीची याचना यामधून रघुते कुटुंबीयांसमोर निर्माण झालेला दारिद्र्याचा बहुपाश दिसून येतो.तालुक्यातील येनस या गावात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या नीता रघुते या महिलेच्या उमेश नामक मुलाला जन्मत:च अपंगत्व आले. त्यामुळे त्याला चालताही येत नाही उचलून नेण्यासाठी त्याला दोन जणांचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर मोलमजुरी करून मुलाचे संगोपन करणे नीता रघुते यांना कठीण होऊन जाते. तुटपुंज्या पैशात मुलाचे संगोपन करावे की पोटाची आग विझवावी हा प्रश्न रघूते कुटुंबियांसमोर निर्माण झाला आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याने उमेशचे वडील नागपूर येथे सायकल दुरुस्ती करतात. त्यामुळे कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकला जातो. आता उमेश पंधरा वर्षांचा झाला असून त्याच्या देखभाल करण्यातच नीता रघुते यांचा पूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे आता उमेशचे संगोपन करताना रघुते कुटुंबीयांना फार अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शासन काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवून नीता रघुते तहसील कार्यालयात गेल्या असता त्यांची शासन दरबारीसुद्धा उपेक्षाच झाली आहे. उमेश अठरा वर्षांचा होईपर्यंत आम्ही त्याला कुठलीही मदत देऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी रघुते कुटुंबीयांसमोर उमेशच्या संगोपनाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेशला ८० टक्के अपंगत्व आले असून परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे रघुते कुटुंबीयांना अशक्य होत आहे. उमेश प्रमाणे असे अनेक दिव्यांग असतील ज्यांच्यावर परिस्थिती अभावी वैद्यकीय उपचार घेणे अशक्य होऊन जाते अशा परिस्थितीत शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत कुठलीही वयोमर्यादा न ठेवता तत्काळ मदतीचा हात देणे गरजेचे आहे, जेणेकरून अपंगत्वावर मात करणे शक्य होईल.