मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST2021-02-07T04:13:16+5:302021-02-07T04:13:16+5:30

वरूड/ लोणी : तालुक्यातील लोणीनजीकच्या पेट्रोलपंपाजवळ मिनीट्रकने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या ...

Two-wheeler killed in mini truck crash | मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वरूड/ लोणी : तालुक्यातील लोणीनजीकच्या पेट्रोलपंपाजवळ मिनीट्रकने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. सागर रामदास सोनारे (२८ रा. लोणी) असे मृताचे नाव आहे.

सागर सोनारे हा शेतातून एमएच ४९ एवाय १२८४ या दुचाकीने घरी जात असताना गावातीलच पेट्रलपंपासमोर एमएच २७ सी ००१८ या मिनीट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. तो मिनीट्रक कापूस घेऊन लोणीहून वरूडकडे जात होता. यात सागरचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेनोडाचे उपनिरीक्षक पपुलवार, एएसआय दीपक काळे, नीलेश भुयार यांनी पंचनामा केला. अपघातानंतर मिनीट्रकचालक गजानन वानखडे (रा. वरूड) याने बेनोडा ठाण्यात आत्मसमर्पण केले. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in mini truck crash