शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावकडे येणाऱ्या दुचाकीला चारचाकीने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

दोन्हीही चालक पथ्रोट परिसरातील, अंजनगाव हद्दीत अपघात वनोजा बाग : अंजनगाव सुर्जीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने सोमवारी सकाळी ११ च्या ...

दोन्हीही चालक पथ्रोट परिसरातील, अंजनगाव हद्दीत अपघात

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. अपघात घडताच पथ्रोटचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटनास्थळ अंजनगाव सुर्जी हद्दीत येत असल्याने तेथील पोलीस ठाण्याने गुन्ह्याची नोंद केली.

चारचाकी वाहन (एम.एच. २७ ए.आर. ३८६५) चालक अरुण काळे (रा. पथ्रोट) याने दुचाकी (एम.एच. २७ सी.डी. ७४६२)घेऊन शेतात जाणाऱ्या मनोहर वानरे व आशिष शेंद्रे (दोन्ही रा. पथ्रोट) यांना उडविले. त्यांना परतवाडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती प्राप्त होताच पथ्रोटचे ठाणेदार नरेंद्र डंबाळे हे घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटना अंजनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे सदर अपघाताची नोंद झाली. पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पांढरी बीट जामदार संजय इंगळे पुढील तपास करीत आहेत.