शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेनगर हद्दीत दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:22 IST

गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदीड लाखांचा मुद्देमाल लंपास : मोहनदीप, साकेत कॉलनीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे.शहरातील गाडगेनगर व राजापेठ हद्दीत सर्वाधिक घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. मध्यंतरी चोरांनी बंद घरांना लक्ष्य करून नागरिकांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी चोरांना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर काही दिवस चोऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा बंद घरांना चोरांनी लक्ष्य केले जात आहे. घरांचा कडीकोंडा तोडून चोरी करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वान काही अंतरापर्यंत जाऊन थांबले. ठसेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवरून रेकॉर्डवरील आरोपींचे ठसे तपासले जाणार आहेत.मोहनदीप कॉलनीतून दीड लाखांची घरफोडीमोहनदीप कॉलनीतील रहिवासी कृष्णाजी विठोबा चौधरी (६१) हे कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते १३ आॅगस्ट रोजी कुटुंबीयांसह पुणे येथे मुलाच्या घरी गेले होते. १९ आॅगस्टला ते परतले तेव्हा कडीकोंडा तुटलेला होता. चोरांनी घरातील आलमारी व कपाट फोडून १५ हजारांची रोख व ५० गॅ्रमचे सोन्याचे दागिने असा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.साकेत कॉलनीत चोरीसाकेत कॉलनीतील रहिवासी निळकंठ त्र्यंबक केराम (६३) बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले असून, दोन मजली इमारतीत मुलासोबत राहतात. मुलगा वरच्या मजल्यावर राहतो. रविवारी रात्री निळकंठ केराम यांनी खालच्या घराला कुलूप लावले आणि मुलाच्या घरात झोपायला गेले. सोमवारी सकाळी ते खाली आले असता, त्यांना कडीकोंडा तुटलेला दिसला. गाडगेनगर पोलिसांनी पंचनामा केला. घरातून १५ हजारांचे सहा ग्रॅ्रम सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केल्याचे आढळले.

टॅग्स :Thiefचोर