शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचोरांच्या दोन टोळ्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. न्यायालयाने सोमवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देनऊ दुचाकी जप्त : कोतवाली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. न्यायालयाने सोमवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.नांलदा विहार येथील रहिवासी राजेश लक्ष्मण जांभुळकर (५७) यांची एमएच ३१ ईव्ही ८४४८ क्रमांकाची दुचाकी २४ नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथून चोरीला गेली होती. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासकामी असताना कोतवाली पोलिसांच्या दोन पथकाने तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एमएच २७ बीएच ५५९३, एमएच २७ एई ३१९७, एमएच २७ एल ५११, एमएच २७ क्यू ४८२९, एमएच २७ एजे ६५७४, एमएच २७ एजी ९५२४, एमएच ३७, एच ५०१२ आणि अन्य एक अशा नऊ दुचाकी (३ लाख १५ हजार) पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अब्दुल कलाम, मनीष सावरकर, गजानन ढेवले, विनोद मालवे, अमोल यादव आणि सागर ठाकरे यांनी ही कारवाई केली. याशिवाय कोतवालीचे पीएसआय गजानन राजमलू, एएसआय राजेंद्र उमक, नीलेश जुनघरे, आशिष विघे, इम्रान खान आणि जुनेद खान यांच्या पथकाने या टोळीतील दोन दुचाकी चोरांना जेरबंद केली.अंमली पदार्थाच्या तस्करीशी जुळले तारदोन आरोपी हे तेलगंणा येथून चारचाकी वाहनाने अमरावतीपर्यंत अंमली पदार्थ आणत असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अंमली पदार्थाची खेप आणल्यानंतर ते शहरात दुचाकी चोरी करीत होते.प्रतिज्ञापत्रवर लिहून दुचाकींची विक्रीदोन चोर हे दुचाकी विक्री करताना संबंधित खरेदीदाराला प्रतिज्ञापत्र लिहून देत होते. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर विक्री व खरेदीदाराचे नाव लिहिणे, घेतलेली रक्कम टाकणे आणि उर्वरित रक्कम घेण्याचा उल्लेख करीत होते.

टॅग्स :Thiefचोर