शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन समुदायांत मारहाण, २ गंभीर,१४ जखमी

By admin | Updated: October 25, 2014 22:32 IST

दोन समुदायांमधील अपंग मुलांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाने उग्ररूप धारण केल्यामुळे नजीकच्या भंडारज येथे दंगल उसळली. दोन्ही समुदायांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला.

लहान मुलांचा वाद विकोपाला : भंडारज येथील घटना, २४ आरोपींना अटकअंजनगाव (सुर्जी) : दोन समुदायांमधील अपंग मुलांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाने उग्ररूप धारण केल्यामुळे नजीकच्या भंडारज येथे दंगल उसळली. दोन्ही समुदायांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला. यात दोन्ही गटांमधील १४ जण जखमी झाले असून गंभीर जखमी अवस्थेतील एकाला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही समुदायांच्या २४ आरोपींना अटक केली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. अंजनगाव-अकोट रस्त्यावर १२ किलोमीटर अंतरावर भंडारज हे गाव आहे. येथील धनवाडी येथे दुपारी दोन विशिष्ट समुदायांमधील अपंग मुलांचा आपसात वाद झाला होता. याबाबत दुसऱ्या समुदायाची समजूत काढण्यासाठी एका समुदायाचे काही लोक त्यांच्या वस्तीत रात्री ८ च्या सुमारास गेले असता वाद संपुष्टात येण्याऐवजी अधिकच विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही समुदायांतील लोकांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व काठ्यांनी हल्ला चढविला. यावेळी एकमेकांवर दगड-विटांचा हल्लासुध्दा करण्यात आला. या घटनेत दोन्ही समुदायातील चौदा जण जखमी झाले. त्यामध्ये अ. एजाज अ. रहिम, अ. ईशाक अ. रहिम, अ. इम्रान अ.कदिर, अ.आरिफ अ. रहिम, अ. रहिम अ. जब्बार, सुभाष राक्षसकर, रमेश राक्षसकर, विशाल राक्षसकर, विनोद राक्षसकर, धम्मराज राक्षसकर, नागेश राक्षसकर, दिनकर राक्षसकर, विकास राक्षसकर यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रथम अंजनगाव ग्रामीण रूग्णालयात व नंतर परतवाडा व अमरावती येथे हलविण्यात आले. प्रदीप दिनकर राक्षसकर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. तर अब्दुल इरफान अ.करीम, अब्दुल एहजाज अ. रहीम, अब्दुल आसिफ अ. रहीम, अ. रहिम अब्दुल जब्बार या जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी अ. रहिम अ. जब्बार (६०) यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अंजनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन, उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, अनिल कविटकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तातडीने कारवाई करून दंगलखोरांना अटक करण्यात आली. पोलीस वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर दोन्ही समुदायांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीत जखमी झालेल्या इसमांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून एकाला नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.