जिल्ह्यातील पुन्हा १०२६ गावांत क्षय, कुष्ठरुग्ण शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:17+5:302021-02-13T04:14:17+5:30

कुष्ठरोगाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. याचा त्रास रोगग्रस्तांना सहन करावा लागत आहे. सदर रोग विषाणूजन्य व सांसर्गिक आहे. ...

Tuberculosis and leprosy research campaign in 1026 villages of the district again | जिल्ह्यातील पुन्हा १०२६ गावांत क्षय, कुष्ठरुग्ण शोधमोहीम

जिल्ह्यातील पुन्हा १०२६ गावांत क्षय, कुष्ठरुग्ण शोधमोहीम

कुष्ठरोगाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. याचा त्रास रोगग्रस्तांना सहन करावा लागत आहे. सदर रोग विषाणूजन्य व सांसर्गिक आहे. बहुविध औषधोपचाराने तो पूर्णत: बरा होतो. तसेच क्षयरोगाच्याही बाबतीत अनेक गैरसमज पहावयास मिळतात. त्यामुळे याबाबत जाणीवजागृती होण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनात टेली फिल्मचा राज्यात पहिला उपक्रम राबविला गेला. त्याला भक्कम प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पूर्ण फिल्म बघितल्यानंतरच उत्तरे सोडविता येतील, अशा आशयाची प्रश्नावली तयार करून पाठविण्यात आली, जेणेकरून प्रत्यक्ष ज्ञान ग्रहण करता यावे, हा यामागील उद्देश आहे. ग्रामीण भागातील अतिजोखमीच्या ९११ गावांतील १४ लाख ६५ हजार ९०३ लोकांची व शहरी भागातील ११५ गावांतील ५ लाख ८४ हजार २७३ व्यक्ती अशा २० लाख ५० १७६ व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. यासाठी २२८३ आशा स्वयंसेविका व ८ अवैस, निवैक, तसेच ३१५ आरोग्यसेवक, ८७४ पुरुष स्वयंकेवक असे एकूण ३४८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Web Title: Tuberculosis and leprosy research campaign in 1026 villages of the district again