शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाच्या अंगावर फोडले होते ट्यूबलाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:42 IST

दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे लागले होते.

ठळक मुद्देशालीकराम पूर्वीपासूनच क्रूर : लोणी हद्दीतील काजना-राजनातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीला बेदम मारहाण करून अमानुषतेचे कळस गाठणाऱ्या शालीकरामने दोन वर्षांपूर्वी पत्नी दीक्षाच्या अंगावर ट्यूबलाईट फोडून तिला गंभीर दुखापत केली होती. लोणी हद्दीतील काजना-राजनात घडलेल्या या घटनेत पोलीस तक्रार झाली. महिला तक्रार निवारण कक्षात समुपदेशनानंतर शालीकराम व दीक्षा पुन्हा एकत्र आले. मात्र, २५ ऑगस्टला त्याने आपण क्रूर असल्याचेच पुन्हा दर्शविले.शालीकराम रोडगे हा पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार करीत आला आहे. तरीदेखील ती पतीची साथ देत होती. मुलांचा विचार करून पतीसोबत जीवनाचा गाडा खेचत होती. मात्र, पती शालीकरामने क्रौर्याची सीमा ओलांडली असल्याने ती आता न्यायाची प्रतीक्षा करीत आहे.दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे लागले होते. या घटनेची तक्रार लोणी पोलिसांत करण्यात आली होती. त्यानंतर कौटुंबिक कलहाचे हे प्रकरण नांदगाव खंडेश्वर येथील महिला तक्रार निवारण कक्षात समुपदेशानासाठी गेले. शालीकरामला माफ करून दीक्षाने पुढील जीवनप्रवाह सुरू केला. मंगळवारी मुलीबाबत घडलेल्या या अनन्वित अत्याचाराचे कथन दीक्षाची आई ताराबाई डोंगरे व स्वत: दीक्षानेही ‘लोकमत’शी बोलताना केले.शालीकराम पोलिसांच्या हाताबाहेरचदीक्षाला तुत्याची काठी, जळते लाकूड, जाड केबलने अमानुष मारहाण करणारा पती शालीकराम अद्याप लोणी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. लोणी पोलिसांची दोन पथके शालीकरामच्या विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो गुंगारा देत आहे. महिलाविषयक इतकी गंभीर घटना घडली असतानाही पोलीस आरोपीला अटक करू शकले नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.आरोपी शालीकराम रोडगेच्या शोधात पथके फिरत आहेत. मात्र, तो अद्याप हाती लागलेला नाही. लवकरच त्याला अटक करू.- सुरेंद्र अहेरकर, पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस