शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न; वाळू चोरट्याचा प्रताप

By admin | Updated: December 21, 2015 00:14 IST

वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर वाहून नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमरावती : वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर वाहून नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९ डिसेंबरला सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी वाहनचालक मंगेश सुभाष सनके (हरताळा) याचेविरुद्ध कलम ३०७, ३५३, २७९, ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. भातकुलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यावर हा जीवघेणा प्रसंग उद्भवला. पाच महिन्यांपूर्वी अमरावतीच्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर वाळू तस्कर आणि चोरट्यांविरुध्द मोहिमेला गती आली होती, हे उल्लेखनीय. भातकुली तालुक्यातील हरताळा नाल्यातून काहीजण वाळुची चोरी आणि अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अजितकुमार येळे हे त्यांच्या पथकासह शनिवारी सायंकाळी हरतोटी फाट्यावर पोहोचले. त्यावेळी चारचाकी वाहनातून वाळुची चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येळे यांनी त्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने अंगावर वाहन घातले.