पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:01:18+5:30

झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांची प्रक्रिया सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदींच्या उपस्थितीत सुरू होती.

Transfers of 77 employees of Panchayat, Education Department | पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देझेडपी : आरोग्य यंत्रणेची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून वर्ग तीन आणि वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याची कार्यवाही सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी (२३ जुलै) पंचायत विभागातील ५१ आणि शिक्षण विभागातील माध्यमिक विभागाच्या २६ अशा एकूण ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मात्र, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू होती.
कोरोनामुळे ग्रामविकास विभागाने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के मर्यादेत बदल्यांचे आदेश झेडपी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरू केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामान्य प्रशासनाचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, पंचायतीचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांच्या उपस्थितीत ५१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागात बदल्यांची उशिरापर्यंत प्रक्रिया
झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांची प्रक्रिया सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदींच्या उपस्थितीत सुरू होती. त्यामुळे आरोग्य विभाागातील नेमक्या किती बदल्या झाल्याात याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Web Title: Transfers of 77 employees of Panchayat, Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.