शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

वन मंत्रालयात बदली, पदोन्नतीच्या फायली तुंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

मुख्यमंत्री फायलींवरील धूळ झटकतील का?, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनाधिकाऱ्यांना प्रतीक्षा अमरावती : गत सात महिन्यांपासून वनाधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीच्या ...

मुख्यमंत्री फायलींवरील धूळ झटकतील का?, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनाधिकाऱ्यांना प्रतीक्षा

अमरावती : गत सात महिन्यांपासून वनाधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीच्या फायली वनमंत्रालयात तुंबून आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या फायलींना मंजुरी दिली असताना, ‘ईएमडी’च्या प्रतीक्षेत त्या वनमंत्रालयात पुढे सरकल्याच नाहीत. आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनखात्याचा कारभार खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ते या फायलींवरील धूळ झटकतील का, अशी प्रतीक्षा वनाधिकाऱ्यांना आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या, पदोन्नतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वनपाल ते वनपरिक्षेत्राधिकारी ५५, वनपरिक्षेत्राधिकारी ते सहायक वनसंरक्षक ८५, तर सहायक वनसंरक्षक ते उपवनसंरक्षक अशा ८८ वनाधिकाऱ्यांची पदोन्नती प्रलंबित आहे. पदोन्नतीस पात्र आठ विभागीय वनाधिकाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही वन मंत्रालयातून आदेश जारी झाला नाही, अशी माहिती आहे. काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ‘मलाईदार’ जागेवर बदलीसाठी फिल्डिंग लावली. मात्र, मध्यस्थांकडून मागणी वाढल्याने आरएफओंच्या बदल्या आजतागायत प्रलंबित आहे.

------------------

आरएफओंच्या विनंती बदल्याही रखडल्या

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, ‘ईएमडी’ पोहचली नसल्याने ऑक्टोबर २०२० पासून ही फाईलसुद्धा ‘जैसे थे’ आहे. पती-पत्नी एकत्रीकरण, आजारपण असे बदल्यांबाबतचे वास्तव असूनही विशेष कार्य अधिकाऱ्यांनी आरएफओंच्या विनंती बदल्यांच्या फायलींवर वनमंत्र्यांची स्वाक्षरी होऊ दिली नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे. कोरोनाचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले होते, हे विशेष.

---------------

बदली, पदोन्नती हस्तक्षेपाने दुखावले होते आयएफएस

वनपाल ते विभागीय वनाधिकारी यांच्या बदल्या, पदोन्नतीत थेट वनमंत्रालयातून हस्तक्षेप वाढला होता. परिणामी भारतीय वन सेवा (आयएफएस) तील अधिकारी दुखावले होते. वरिष्ठ वनाधिकारी आणि वनमंत्री यांच्यात विसंवाद होता, अशी माहिती आहे. वनमंत्री दौऱ्यावर आले तरी वरिष्ठ वनाधिकारी (आयएफएस) अनेकदा गैरहजर राहायचे. कनिष्ठ वनाधिकारीच वनमंत्र्यांना ‘अटेंड’ करायचे.