शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपक्षी हरियालवर विषप्रयोग; नऊ मृत

By admin | Updated: March 4, 2017 00:01 IST

राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त पाच हरियाल व अन्य प्रजातीच्या चार पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्यात आल्याची घटना ...

बडनेऱ्यात परप्रांतीयांचा प्रताप : चार संशयित ताब्यात, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षाबडनेरा : राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त पाच हरियाल व अन्य प्रजातीच्या चार पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्यात आल्याची घटना बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी वनविभागाने चार संशयिताना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.प्राप्त माहितीनुसार, बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात पिंपळाचे झाड आहे. अनेक वर्षांपासून या झाडांवर हरियाल, बुलबुल, मैना व इतर पक्षांचे थवेच्या थवे वास्तव्यास राहतात. परिसरातील पक्षीप्रेमीदेखील त्यांचे संगोपन, खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. या पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांसाठी जलपात्राची व्यवस्था आहे. मात्र गत दोन दिवसांपासून पक्षी मृत्यू पावत असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. पाच हरियाल, तीन बुलबुल व एक मैना या पक्ष्यांचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची घटना प्राथमिक स्वरुपात समोर आली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील खुल्या जागेत अनेक दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा जमावडा आहे. येथे परप्रांतीय झोपड्या थाटून राहतात. हाकेच्या अंतरावर पिंपळाचे झाड आहे. अचानक पक्ष्यांचा झालेल्या मृत्यूमुळे घटनास्थळी मुसाफिरांनीच मांस खाण्यासाठी त्यांना मारले असावे, असा अंदाज प्रत्यक्षदर्शनींनी वनविभागाकडे व्यक्त केला. दरम्यान आपले पितळ उघडे पडेल, या भीतीपोटी परप्रांतीय मुसाफीर पसार होण्याचे मनसुबे रचत असताना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने चार जणांना ताब्यात घेतले. अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्यांनी पक्षाचे मांस खाण्यासाठी त्यांना ठार मारले असावे, असा अंदाज प्राथमिक स्वरुपात वनविभागालादेखील आला. विषप्रयोगातून नऊ पक्ष्यांना मारण्यात आल्याच्या घटनेमुळे शहरवासीयांसह पक्षीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पक्षांच्या अचानक मृत्युप्रकरणी वनविभाग कारणमीमांसा शोधत आहे. पक्ष्यांचा मृत्यू विषप्रयोग अथवा कोणत्या रोगामुळे झाला? याबाबत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)हरियाल राज्यपक्षी म्हणून घोषित हरियाल या पक्षाला राज्य शासनाने राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. वाघ, मोर यासारख्या प्रजातीमध्ये हरियाल पक्षाची गणना आहे. त्याचे संवर्धन, सुरक्षेसाठी वनविभागाला प्रामुख्याने जबाबदारी घ्यावी लागते. हरियाल पक्षी बडनेऱ्यात वास्तव्यास आहे, याची पुसटशी कल्पना वडाळी वनविभागाच्या बडनेरा सर्कल कार्यालयास नव्हती. पक्षांचे मृत्यू झाले, ही माहिती वनविभागाला देण्यात आली. परंतु वनपाल, वनरक्षक आदी तब्बल एक तास उशीराने पोहोचले. त्यांचे आगमन केवळ ‘फोटोशेषण’ ठरले.रेल्वेस्थानक परिसर असुरक्षित, पोलिसांचे दुर्लक्ष ‘लोकमत’ने रेल्वेस्थानक असुरक्षित असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले आहे. मोठ्या संख्येत मुसाफीर येथे वास्तव्यास आहे. मारहाणीच्या घटना वाढलेल्या आहेत. परप्रातांतील लोकांवर रेल्वे पोलिसांसह बडनेरा पोलीस प्रशासनाचा कुठलाच अंकुश नसल्याचे चित्र आहे. परप्रांतीयाचे नियमबाह्य वास्तव्य हे बडनेरा शहरासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.वन्यजीव गुन्हा नोंदविलाबडनेरा रेल्वे स्थानक परिसरात एका पिंपळाच्या झाडावर पाच हरियाल व अन्य चार पक्ष्यांच्या मृत्यूप्रकरणी वनगुन्हा नोंदविला आहे. वनगुन्हा क्रमांक १६/२० अन्वये ३ मार्च रोजी नोंदविण्यात आला आहे. ताब्यातील चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी दिली.