तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:00 AM2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:58+5:30

तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

Tivasa 71, Bhatkuli 82 per cent turnout | तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान

तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विविध पक्ष, अपक्षासह १२२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. त्यांच्या भाग्याचा फैसला १९ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणीअंती होणार आहे. तिवस्यात  ७०.७० टक्के, तर भातकुली नगरपंचायतीत ८१.६१ टक्के मतदान झाले.
नगरपंचायत निवडणूक अतिशय कडाक्याच्या थंडीत झाली. पहाटे १० वाजतापर्यंत भातकुली, तिवसा येथील मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. मात्र, दुपारी १२ वाजतानंतर केंद्रावर गर्दी वाढली. भातकुली नगरपंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ८१.६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

भातकुलीत ६० उमेदवार 
- भातकुली नगरपंचायतीच्या निवडणुकीत २७५२ पुरुष, तर २,४९२ महिला असे एकूण ५,२४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. १६ प्रभागातील एकूण ६० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा शाळांमध्ये १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज होती.
तिवस्यात ६२ उमेदवार
- रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. भातकुली येथील जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमांच्या चार शाळा, छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय व जडावबाई राठी विद्यालय येथे एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत झाले. १६ प्रभागातील २७५२ पुरुष व २४९२ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. भातुकली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.

पालकमंत्री, आमदार, नेत्यांची परीक्षा
तिवसा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर, तर भातकुलीत आमदार रवि राणा यांच्यासाठी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. गत आठ दिवसांपासून आमदार प्रवीण पोटे, शिवसेनेचे राजेश वानखडे, भाजप  जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, बाजार समितीचे उपाध्यक्ष नाना नागमोते यांनीदेखील उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. आता १९ जानेवारी रोजी निकालानंतरच कोण बाजी मारणार, हे निश्चित होणार आहे.

 

Web Title: Tivasa 71, Bhatkuli 82 per cent turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.