शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावे कंटेनमेंट झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

तालुक्यातील रहिमतपूर, मांजरी, म्हसला, ही तीन गावे कंटेनमेंट झोनमध्ये असून, केंद्रबिंदूपासून सात किलोमीटर परिसरातील येरंडगाव, दादापूर, अडगाव बू., सातरगाव, सावनेर, खिरसाना, निरसाना ही सहा गावे बफर झोनमध्ये आहेत. कंटेनमेंट व बफर झोनमधील काही गावे चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर काही गावे नांदगाव खंडेश्वरमध्ये, तर काही गावे लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.

ठळक मुद्देसहा गावे बफर झोनमध्ये : मांजरी म्हसला सॅनिटाईज्ड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मांजरी म्हसला येथील एका १६ वर्षीय मुलाचा कोरोना चाचणी अहवाल १० जूनला पॉझिटिव्ह आल्याने ११ जून रोजी येथील कंटेनमेंट झोन व बफर झोन घोषित करण्यात आले. या मुलाच्या संपर्कात आलेल्यांची यादी केली असून १७ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
तालुक्यातील रहिमतपूर, मांजरी, म्हसला, ही तीन गावे कंटेनमेंट झोनमध्ये असून, केंद्रबिंदूपासून सात किलोमीटर परिसरातील येरंडगाव, दादापूर, अडगाव बू., सातरगाव, सावनेर, खिरसाना, निरसाना ही सहा गावे बफर झोनमध्ये आहेत. कंटेनमेंट व बफर झोनमधील काही गावे चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर काही गावे नांदगाव खंडेश्वरमध्ये, तर काही गावे लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. गुरूवारी सकाळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठलराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे हे होते. दरम्यान सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू गावात होती. यात सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जाधव, डॉ.अंकुश सुकळकर, आरोग्य सहायक एच.बी.होळकर, आरोग्य सेवक किशोर धानोरकर, कोतवाल सचिन गोमासे, पोलीस पाटील संतोष चव्हाण, विकी देशमुख, तसेच आरोग्य विभागातील मंडळी होती. यापूर्वी १० जूनला रात्री ११ वाजता पंचायत समितीचे उपसभापती राजीव घोडे यांनी गावाचा आढावा घेतला होता.
 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या