शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात एसीबीचे एकाच दिवशी तीन ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 21:20 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाने मंगळवारी तब्बल तीन सापळे यशस्वी केले.

ठळक मुद्देसरपंच, ग्रामसेवक, पोलीस, दुय्यम निबंधकांना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाने मंगळवारी तब्बल तीन सापळे यशस्वी केले. वरूड, धामणगाव रेल्वे व धारणी येथे सापळे रचून सरपंच, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी, प्रभारी दुय्यम निबंधक व एका खासगी दस्तलेखकाला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.सरपंच, ग्रामसेवकास लाच घेताना अटकवरूड तालुक्यातील बेसखेडा येथील सरपंच विष्णु सदाशिवराव यावले (४७) व तेथे कार्यरत ग्रामसेवक पवन ओंकार सोमवंशी (३५) यांना १४ हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.वरूड पंचायत समितीलगत असलेल्या एका चहा टपरीस्थळी मंगळवारी ही एसीबीने ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे ग्रामरोजगार सेवक आहेत. ग्रामपंचायत बेसखेडा येथे सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेमध्ये बोगस रोजगार दाखवा, त्याचे बिल काढा आणि त्यापोटी प्रत्येकी १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी ग्रामसेवक व सरपंचांनी केली. तडजोडीअंती दोन्ही आरोपींनी एकूण १४ हजार रुपये लाच स्विकारली. दोन्ही आरोपींना वरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.धारणी पोलीस ठाण्याचा कर्मचारी जाळ्यातधारणी पोलीस ठाण्याचा कर्मचारी सुशील गुल्हाने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली.जांबू गावातील तक्रारदार ४५ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, महिलेचे जावई व त्यांचे मोठे भाऊ यांचे गुन्ह्यात नाव न गोवण्यासाठी नायक पोलीस शिपाई सुशील गुल्हाने याने चार हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत सदर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सुशील गुल्हानेने त्या महिलेला जयस्तंभ चौकातील एका प्रेस दुकानामध्ये पैसे घेऊन बोलावले होते. ती तेथे पैसे घेऊन पोहोचल्यावर तिच्याकडील पैसे स्वीकारताना सुशील गुल्हाने याला लाचलुचपत विभागाने धाड टाकून रंगेहाथ पकडले.दुय्यम निबंधक ट्रॅपधामणगाव रेल्वे येथे मोठ्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेपैकी तिसरा हिस्सा जागा नावाने करून देण्याच्या मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकासह एका खाजगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही कारवाई केली. कुंडलिक कोमल राठोड (३०) असे प्रभारी दुय्यम निबंधकाचे, तर एजाज खान बिस्मिल्ला खान (३४) असे खासगी दस्तलेखकाचे नाव आहे. मंगळवारी कार्यालयातच दोघांनी लाच स्विकारली. तक्रारकर्ता तळेगाव दशासर येथील रहिवासी आहे. दत्तापूर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग