शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

तीन शिक्षिकांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: September 30, 2015 00:25 IST

महापालिकेच्या रहाटगाव येथील शाळेच्या तीन सहायक शिक्षिकांनी निवडणूक संदर्भातील कामे नाकारल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

निवडणूक कामाला नकार : महापालिका आयुक्तांची कारवाईअमरावती : महापालिकेच्या रहाटगाव येथील शाळेच्या तीन सहायक शिक्षिकांनी निवडणूक संदर्भातील कामे नाकारल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त पत्राच्या आधारे करण्यात आली आहे.सन २०१२ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महापालिका प्रभाग क्र. ६,७ व ८ मधील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे काम या तीनही सहायक शिक्षिकांना सोपविण्यात आले होते. मात्र, या तीनही शिक्षिकांनी मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश स्वीकारले नव्हते. ही बाब तत्कालीन आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला कळविली होती. विधानसभा, लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर निवडणूकविषयी कामे नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. किंबहुना ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे नाकारली, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सहायक शिक्षिका विद्या मालपे, प्रेमलता शंभरकर व मंजू वानखडे यांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या आदेशाची प्रत सामान्य प्रशासन विभागाने या तिनही सहायक शिक्षिकांना बजावली आहे.शिक्षण विभाग शुध्दीकरणासाठी प्रयत्नमहापालिकेचा शिक्षण विभाग सतत चर्चेत राहात असताना या विभागाचा कारभार सुधारावा, यासाठी आयुक्त गुडेवार यांनी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी वाकोडे यांच्याकडे या विभागाची धुरा सोपविली आहे. शिक्षकांची अंतर्गत भांडणे, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेपातून हा विभाग मुक्त केला जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भरखासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळेतील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना त्यांनी कानमंत्र दिला आहे. त्यानुसार शाळांमध्ये शिक्षक कार्यरत आहे. कामात हयगय केल्याप्रकरणी तीन सहायक शिक्षिकेची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून तसे पत्र होते. सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव सादर केला होता.- चंद्रकांत गुडेवारआयुक्त, महापालिका.