शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तास ताटकळले शाळकरी विद्यार्थी!

By admin | Updated: August 13, 2015 00:52 IST

मंगळवारी संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर. शाळेची वेळ संपून कित्येक तास उलटून गेल्यावरही रात्रीपर्यंत शाळकरी मुले घरी पोहोचलीच नाहीत,...

मोर्शी : मंगळवारी संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर. शाळेची वेळ संपून कित्येक तास उलटून गेल्यावरही रात्रीपर्यंत शाळकरी मुले घरी पोहोचलीच नाहीत, बसस्थानकावर लावलेला फोन उचलला जात नाही, पालकांची घालमेल वाढत चाललेली. उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. शेवटी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले आणि पालकांचा जीव भांड्यात पडला. मोर्शी तालुक्यात मंगळवारी हा प्रकार घडला. तालुक्यातील गोराळा, सावरखेड, लेहगाव, निंभी, शिरखेड या अमरावती मार्गावर दुपारी ४ वाजतापासून कोणतीच बस धावली नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळावे लागल्याची बाब उघडकीस आली आणि पालकांचा एसटी महामंडळाविरूध्दचा संताप अधिकच अनावर झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोर्शी शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेताहेत. पालकांनी त्यांना एसटीच्या पासेस काढून दिल्या आहेत. करतात. आगार व्यवस्थापकाचे पद रिक्त राज्य परीवहन महामंडळाचे येथील आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांनी वाहकांच्या खाबुुगिरीला लगाम लावल्यामुळे चिडलेल्या दोन संघटनांनी त्यांना हटविण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. थेट मुंबईहून राजकीय दडपण आल्यामुळे शेवटी आगार व्यवस्थापकांची येथून बदली करण्यात आली. त्यामुळे आगार व्यवस्थापकाचे येथील पद रिक्त आहे. जबाबदार अधिकाऱ्याविना येथील व्यवस्थापन बारगळले आहे. महसूल प्रशासनाची तयारी ! एसडीओ वऱ्हाडे यांनी बसस्थानक गाठण्यापूर्वीच एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन अमरावती मार्गाने निघून गेली होती. परंतु बस पोहोचली नसती तर विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वाहनातून त्यांच्या गावी पोहोचवून देण्याची तयारी एसडीओ वऱ्हाडे यांनी केली होती.