शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

३९ दिवसानंतरही तीन अंकी रुग्ण कायम, सोमवारी पुन्हा २३५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमित रुग्ण तीन अंकी आढळून येण्याचा आलेख कायम आहे. विशेषत: शहरी भागातच पॉझिटिव्ह ...

अमरावती : नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमित रुग्ण तीन अंकी आढळून येण्याचा आलेख कायम आहे. विशेषत: शहरी भागातच पॉझिटिव्ह रुग्ण मिळत असल्याने आरोग्य यंत्रणांनी आता नव्याने उपाययोजनांना प्रारंभ केला आहे. सोमवारपासून मास्क न वापरणे, शारीरिक अंतर न ठेवणे आणि सार्वजनिक स्थळी थुंकणे याविरूद्ध धडक मोहीम उघडल्याची कार्यवाही हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.

१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान ३९ दिवस ओलांडले असले तरी कोरोना संक्रमित रूग्णांची आकडेवारी ही तीन अंकी कायम आहे. तर, फेब्रुवारीपासून रूग्ण संख्या वाढीला वेग आला आहे. जिल्ह्यातील संक्रमितांचा मृत्यूदर हा इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक असल्याबाबतची चिंता रविवारी केंद्रीय आराेग्य पथकाने व्यक्त केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात २० पथके नेमण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने पाचही झोन अंतर्गत कारोना त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. एकुणच कोरोनाची आकडेवारी बघता स्थिती धक्कादायक मानली जात आहे. सोमवारी २३५ संक्रमित आढळले असून, ३०७ रूग्ण दाखल आहेत. तर ८९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. गृह विलगिकरणात ग्रामीण भागात २४७ तर, शहरी भागात ५४ रूग्ण आहेत. उपचारादरम्यान सोमवारी एकाचा मृत्यू झाला असृून, आतापर्यंत ४२४ जणांना प्राण गमवावे लागले आहे.

०००००००००००००००००००००

फेब्रुवारीत आठ दिवसांत संक्रमित रूग्ण

१ फेब्रुवारी------------------ ९२

२ फेब्रुवारी------------------ ११८

३ फेब्रुवारी------------------१७९

४ फेब्रुवारी------------------१५८

५ फेब्रुवारी------------------२३३

६ फेब्रुवारी------------------ २७०

७ फेब्रुवारी------------------ १९२

८ फेब्रुवारी------------------ २३५

--------------

महापालिका सहाय्यक आयुक्तांवर विशेष जबाबदारी

अमरावती महानगरात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाचही झोनच्या सहायक आयुक्तांवर कोरोना नियंत्रणासाठी विशेष जबाबदारी सोपविली जाणार आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी त्यानुसार तयारी चालविली आहे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर, हॅन्डवॉश करणे, गर्दी टाळणे, सर्दी, खोकला, ताप असल्यास तपासणी करून घेणे आदीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कोरोना नियमावलींचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी सहायक आयुक्तांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.