शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सव

By admin | Updated: January 20, 2015 22:29 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखलदरा येथील पोलीस स्टेशनसमोरील मैदानात आयोजित चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार प्रभूदास भिलावेकर उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे आमदार सुनील देशमुख, पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाच्या सचिव वल्सा नायर- सिंह, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी, जिल्हाधिकारी किरण गित्ते हे राहणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी रांगोळी रेखाटन, प्रभातफेरी उत्सव, आदिवासी नृत्य, विविध कला दालनाचे उद्घाटन, विशेषांकाचे प्रकाशन, बांबू शिल्प कार्यशाळेचे उद्घाटन, फोटो प्रदर्शनीचे उद्घाटन, विविध वस्तू विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन केले जाणार आहे. विविध साहसी उपक्रमांतर्गत पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायंबीग, हॉट एअर बलुन, पदभ्रमण, हत्त, घोडा व उंट सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच खंजेरी भजन स्पर्धा, मशाल महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमात विदर्भ संध्या हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ जानेवारी रोजी लोकनृत्य स्पर्धा, विविध साहसी उपक्रम, खंजेरी भजन स्पर्धा, आदिवासी लोकनृत्य स्पर्धा, कला पथक, सांस्कृतिक कार्यक्रमात हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी मेळघाट मॅरॉथान स्पर्धा, खंजेरी भजन स्पर्धा, विविध साहसी उपक्रमात पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायबिंग, हॉट एअर बलुन, पदभ्रमण, हत्ती, घोडा व उंट सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपीय कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ केला जाईल. या पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. गुलाबी थंडीत होणाऱ्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.