तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST2021-02-15T04:12:31+5:302021-02-15T04:12:31+5:30

तिवसा : तालुक्यातील धामंत्री वाळूघाटात झालेल्या जबर मारहाणीत वरखेड येथील ट्रॅक्टरचालक संकेत भगत या युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिवसा पोलिसांनी शनिवारी ...

Three arrested in youth murder case | तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघे गजाआड

तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघे गजाआड

तिवसा : तालुक्यातील धामंत्री वाळूघाटात झालेल्या जबर मारहाणीत वरखेड येथील ट्रॅक्टरचालक संकेत भगत या युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिवसा पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे.

तालुक्यातील धामंत्री वाळूघाटात ट्रॅक्टर घेऊन जात असताना तेथे दारू पिण्यासाठी आलेल्या चार जणांसोबत संकेत भगतचा ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात संकेतच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्यामुळेच त्याचा १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री मृत संकेतच्या नातेवाइकांनी तिवसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजू देवराव मारबदे, मनोज यशवंत जवंजाळ, भास्कर मधुकर बावणे व भीमराव जानराव जवंजाळ (रा.सर्व टाकरखेडा, जि. वर्धा) या चौघांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. १२ फेब्रुवारी रोजी रात्री तीन आरोपींना अमरावतीहून अटक केली, तर भीमराव जवंजाळ पसार आहे.

Web Title: Three arrested in youth murder case