शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सेना शहराध्यक्षासह तिघांना अटक

By admin | Updated: January 15, 2017 00:04 IST

मोझरी येथील अवैध दारु विक्रेता महेंद्र ठाकूर हत्याप्रकरणाी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य दोन युवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली.

महेंद्र ठाकूर हत्या प्रकरण : डाव फसलातिवसा : मोझरी येथील अवैध दारु विक्रेता महेंद्र ठाकूर हत्याप्रकरणाी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य दोन युवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याचे अन्य ७ साथीदार पसार आहेत. महेंद्रचा साथीदार संदीप ढोबाळे यांची जुन्या वादातून हत्या करण्याचा कट होता. परंतु तो पळाल्याने महेंद्रशी बाचाबाची होऊन त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती तिवसा पोलिसांनी दिली. गणेशोत्सवापूर्वी वर्गणी मागण्यावरून फिर्यादी संदीप ढोबाळे व आरोपींचा वाद झाला होता .संदीपला यावेळी मारहाण करण्यात आली होती. प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी संदीपने यवतमाळच्या कुख्यात प्रवीण दिवटे गँगमधील काही सदस्याला बोलविले होते. परंतु, त्यांना घटनेतील आरोपी मिळाले नाही. त्यांनी अन्य एका युवकाला मारहाण करीत त्याची गाडी जाळली होती. तेव्हापासून या दोन्ही गटात खुमखुमी होती. शुक्रवारी महेंद्र ठाकूर व संदीप ढोबाळे हे कामानिमित्त तिवसा तहसील कार्यालयात आले होते. तेथेच त्यांना कटाचा सुगावा लागला. हे दोघेही नागपूरच्या दिशेने एका दुचाकीने पळाले. मात्र, कृष्णा ढाब्याजवळ दुचाकीतील पेट्रोल संपल्याने महेंद्र तेथे थांबला व संदीप पळाल्याने तो हल्लेखोरांपासून बचावला.कुऱ्ह्यातून आरोपींना अटकतिवसा : यावेळी संदीप ढोबाळे याला मारहाण करायला आलेल्या युवकांनी महेंद्र ठाकूर यांच्याशी बाचाबाची झाली व वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी धारदार शस्त्रांनी महेंद्रच्या डोक्यावर व छातीवर वार केले. यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची तक्रार संदीप ढोबाळे यांनी तिवसा ठाण्यात केली. अमरावती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील, सागर सुरेश वाघमारे व स्वप्नील अनिल वानखडे या तीन युवकांना कुऱ्हा येथून अटक केली. घटनेतील शिवसेना नगरसेवक किशोर सातपुते, सोनु लांडगे, राहुल बाभुळकर, अन्य सात आरोपी अद्याप पसार आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे. तिवसा येथे अद्यापही तणावसदृश स्थिती आहे. तिवस्याचे ठाणेदार दिनेश शेळके पुढील तपास करीत आहे. (प्रतिनिधी)