शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चोर उठले जिवावर, 'सीपी' तरीही मेहेरबान अधिकाऱ्यांवर!

By admin | Updated: June 21, 2014 01:16 IST

घरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत.

गणेश देशमुख अमरावतीघरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत. सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला तरीही का मेहरबान आहेत, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शहरातील फरशी स्टॉप भागात गुरुवारी दिवसाढवळ्या एका वृद्धेचा गळा आवळून चोरांनी घरातून दागिने लूटून नेलेत. आतापर्यंत घरे फोडून चोरी करणारे चोरटे नागरिकांच्या प्राणांवर उठले आहेत. पोलीस आयुक्तांनी वेशांतर करून फिरण्याची अपेक्षा जनतेची असताना आता चोरच वेशांतर करून अधिक गंभीर गुन्हे करीत फिरू लागले आहेत. गुरुवारच्या घटनेत चोर बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून राजरोसपणे घरात शिरले. घरातील माणसांचा राबता लक्षात घेतला. संधी साधून चहापाणी करणाऱ्या सवितार्इंवरच हल्ला केला. लूटमार करून ते पसार झाले. पोलीस तमाम अधिकाऱ्यांच्या तुलनेत सतत तल्लखपणा दाखविणाऱ्या या चोरांनी यावेळीही चोरीच्या बदलविलेल्या पद्धतीतून स्वत: पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे शिक्कामोर्तब केले. हे तर हत्यारेच !सविता पांढरीकर चोरांच्या हल्यात बेशुद्ध झाल्या असल्या तरी, खरे तर चोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाच केला होता. त्या मृत झाल्याचे समजूनच चोरांनी त्यांच्या अंगावरील सुमारे ६० ग्रॅम सोने लूटून नेले. 'काळ आला होता; पण वेळ आली नसल्या'ने वृद्ध सवितातार्इंचा जीव वाचला. घरात शिरून दिवसाढवळ्या नागरिकांना ठार मारण्याचा जो इरादा चोरांचा होता, तो बघता अमरावतीकर पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. आदीदास शोरूममधील चोरीप्रकरणी आणि गुरुवारी रात्री विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी अमरावती पोलिसांनी उत्तम आणि वेगवान तपासकार्य केले. त्यासाठी पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी. त्याचवेळी पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारांना भय वाटेनासे झाले, हे जळजळीत वास्तव पुन्हा एकदा ठळपणे समोर आल्याची आठवणही त्यांना करून द्यावीशी वाटते. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत गंभीर गुन्हे घडत आहेत, पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी, ही लोकभावना आहे. नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा नाही, हा संदेश देऊन आयुक्तांनी लोकभावनेचा आदर का करू नये?