शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तर अधिकारी घरी पाठवू

By admin | Updated: January 20, 2015 22:30 IST

महानगरात विना परवानगीने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्दावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. महापौरांनी तर या विषयावरुन एक,

महापौरांचे निर्देश : अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचा प्रश्न पेटलाअमरावती : महानगरात विना परवानगीने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्दावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. महापौरांनी तर या विषयावरुन एक, दोन अधिकाऱ्यांना घरी पाठवावे लागेल, असे निर्देश दिलेत. हा विषय जनविकास- रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड यांनी दमदारपणे सभागृहात मांडला.महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहरात उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय चांगलाच गाजला. प्रकाश बनसोड यांनी हा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना प्रशासनाला सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचा विषय पुढील सभेत घेण्याचा प्रस्ताव येताच प्रकाश बनसोड जाम उखडले. प्री- मिटिीगमध्ये ठरलेले विषय रद्द होत असेल तर कार्यक्रम पत्रिका तोंडावर फेकणार, असे म्हणत बनसोड आक्रमक झालेत. बडनेऱ्यात एका रात्रीतून अनिधकृत मोबाईल टॉवर उभारणीची किमया करणाऱ्या अभियंत्यांचा नावाचा उल्लेख करुन प्रकाश बनसोड यांनी महापालिकेतील सहायक संचालक नगररचना विभागात सुरु असलेल्या अफलातून कारभाराची चिरफाड केली. हा विषय चांगलाच गाजत असताना अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीतून त्रस्त असलेल्या सदस्यांनी चर्चेत सहभागी होत प्रशासनावर ताशेरे ओढले. चेतन पवार, दिनेश बूब, प्रदीप दंदे, सुनील काळे, जयश्री मोरया, कांचन गे्रसपुंजे, अर्चना इंगोले, सुजाता झाडे, प्रशांत वानखडे, राजू मसराम, निलिमा काळे, प्रदीप बाजड आदींनी अनधिकृत मोबाईल टॉवर, अतिक्रमण विषय यापुढे सर्वसाधारण सभेत येता कामा नये, असे प्रशासनाला आदेशित केले. प्रकाश बनसोड यांनी बडनेऱ्यात ज्या भागात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे, त्याच मालकाने नियमबाह्य रो-हाऊस, सदनिका उभारल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली.