शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

-आता मायानगरात एल्गार

By admin | Updated: February 24, 2015 01:07 IST

वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होत नाही तोच नवाथे, नवसारी आता गोपालनगर

अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होत नाही तोच नवाथे, नवसारी आता गोपालनगर परिसरातील मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सोमवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून दारुबंदी करण्याच्या घोषणा दिल्यात. येथील मायानगर, गोपालनगर कृती समितीच्यावतीने मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी महिला शक्ती सरसावल्या आहेत. यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दारु विक्रीचे दुकान बंद करण्याबाबत निवेदन सादर केले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. परिणामी सोमवारी संतप्त महिला जिल्हाकचेरीवर धडकल्यात. जिल्हाधिकारी गित्ते हे बैठकीला गेल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिली. तब्बल तीन ते चार तास जिल्हाधिकाऱ्यांना येण्यास अवधी असल्याचे सांगितले गेले. निवेदन द्यायचे असेल तर अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना द्यावे, असे स्वीय सहायकांनी म्हणताच, आंदोलक महिलांचा पारा चढला. अखेर काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या. मायानगरातील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी त्यांनी आक्रमकपणे केली. पोलिसांची उडाली तारांबळ४सोमवार हा आंदोलनाचा 'वॉर' म्हणून गृहित धरला जातो. त्यानुसार मायानगर येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिला धडकल्या. जिल्हाकचेरीच्या प्रवेशद्वारावर या महिलांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक महिला काही केल्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, असे म्हणत पोलिसांना न जुमानता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली, हे विशेष!दारुबंदीसाठी मतदान होणारमायानगर, गोपालनगर परिसरातील महिलांच्या मागणीनुसार देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी नियमानुसार मतदान घेतले जाईल. २५ टक्के महिलांचा त्याकरिता सहभाग आवश्यक राहील. मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभाग नोंदविल्यास हे दारु विक्रीचे दुकान बंद करणे शक्य असल्याचे एक्साईजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. विना कठड्याच्या विहिरीने घेतला बिबट्याचा बळीदुर्लक्ष : भिवापूर-वागदा शिवारातील घटनाचांदूररेल्वे : शेतातील विना कठड्याची विहीर दीड वर्षाच्या बिबट्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची घटना चांदूररेल्वे तालुक्याच्या सीमेवरील भिवापूर वाढोणा जंगलालगत शेतशिवारात घडली. शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट्या सरळ विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटना शनिवारच्या सायंकाळी उघडकीस आली.चांदूररेल्वे तालुक्याच्या सिमेवरील भिवापूर वाढोणा जंगलाला लागून असलेल्या भिवापूर-वागदा शेत शिवारात दीपक कनोजे यांच्या शेतातील विहिरीत मृत बिबट्या आढळल्याची घटना शनिवारच्या सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चांदूररेल्वे उपवनपरिक्षेत्राचे आरएफओ अनंत गावंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. रात्र झाल्यामुळे मृत बिबट्याला रविवारी सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले. उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात व सहायक उपवनसंरक्षक व्ही. एम. मिसाळकर यांच्या उपस्थितीत आरएफओ अनंत गावंडे यांनी पशूधन विकास अधिकारी यांच्या हस्ते बिबट्याचे शवविच्छेदन केले.