शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट पर्यटन विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्या

By admin | Updated: September 8, 2014 23:28 IST

मेळघाट पर्यटन विकास, चिखलदऱ्याच्या विकासातून रोजगार उत्पादनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामाला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री

अमरावती : मेळघाट पर्यटन विकास, चिखलदऱ्याच्या विकासातून रोजगार उत्पादनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामाला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री तथा राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासनाच्यादृष्टीने मेळघाट हा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. आरोग्य सुधारणा, कुपोषण निर्मूलन, रस्ते विकास, अंगणवाड्यांच्या इमारती व आदिवासींच्या विकासासाठी असलेल्या योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीला प्राधान्य दिले जावे. धारणी परिसरातील सर्व आरोग्य केंद्रांची दुरूस्ती, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा रूग्णांना लाभ मिळवून देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मेळघाटात अतिवृष्टीतील नुकसान भरपाई तत्काळ देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. वर्ष २०११ ते २०१५ या वर्षांत सर्वसाधारण योजनेंतर्गत ६०५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी आॅगस्ट २०१४ अखेर ४५५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सन २०११-१२ ते सन २०१४-१५ पर्यंत २४३ कोटी ८८ लाख रुपये इतक्या मंजूर निधीपैकी २०५ कोटी ९१ लाख रुपये खर्च झाले आहेत. आदिवासी उपयोजनेखाली सन २०११-१२ ते २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षात मिळून ४१६ कोटी १५ लाख रुपये निधी मंजूर होता. त्यापैकी आॅगस्ट २०१४ अखेर २३६ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रास्ताविक केले. मानव विकास निधीतून आरोग्य शिबिरांचे आयोजन, महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने आदिवासी भागातील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, ‘टुरिझम’ जिल्हा म्हणून मेळघाटचा विकास करणे, मानव निर्देशांकात जिल्हा खालच्या पातळीवर आहे. त्यादृष्टीने सर्व योजना राबविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास, पशुसंवर्धन, क्रीडा विकास आदी विभागाच्या कामांचा आढावा घेतला.