शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भूगावच्या आदर्श शाळेवर विद्यार्थी, पालकांचा बहिष्कार

By admin | Updated: September 24, 2015 00:23 IST

परतवाडा मुख्य महामार्गावरील भूगाव येथील आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून शाळेवर बहिष्कार टाकला.

पोलिसांना पाचारण : शिक्षिकेला शिकविता येत नसल्याचा आरोपनरेंद्र जावरे अचलपूरअमरावती-परतवाडा मुख्य महामार्गावरील भूगाव येथील आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून शाळेवर बहिष्कार टाकला. शिक्षिकेला गणित व विज्ञान विषय शिकविता येत नसल्याचा आरोप करीत पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. शिक्षिकेची हकालपट्टी करीत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे. भूगाव येथे आदर्श शिक्षण संस्थेद्वारा १९६१ पासून आदर्श विद्यालय सुरू आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत २७० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मागील दीड वर्षांपासून येथे गणित व विज्ञान विषयासाठी प्रतिभा गुणवंतराव ठाकरे या शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली. या उच्चशिक्षित शिक्षिकेला शिकविता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे केल्या होत्या. पालकांनी संस्थाध्यक्ष प्रदीप पाटील व मुख्याध्यापक आर.के.गादे यांना याबाबत माहिती दिली होती. या दोन्ही जबाबदार व्यक्तिंनी शिक्षिकेला शिक्षण पध्दतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकविण्याची नोटीस बजावली होती. मात्र, कुठलीच सुधारणा न झाल्याने संतप्त पालकांनी बुधवारी सकाळी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. सर्व विद्यार्थी व पालकींनी संबंधित शिक्षिकेला शिकविण्यास बंदी घालावी, शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी शाळेसमोर केली. पालकांचा संताप लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरमसपुरा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शिकविण्याची पद्धत चुकीचीप्रतिभा ठाकरे या इयत्ता सहावी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिकवितात. एके दिवशी शिकविताना ९ मधून ६ गेल्यास ६ उरतील, १८० मधून १४० वजा केल्यास १४० उरतील, अशी उत्तरे दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना केला. शिक्षिकेची शिकविण्याची पध्दत समजत नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मुख्याध्यापकांवर लावले आरोपशिक्षिकेला शिकविता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने तिच्या शिकवण्याच्या पध्दतीचे अवलोकन करण्याकरिता मुख्याध्यापकांनी त्यांच्या वर्गाला भेट दिली. स्थिती लक्षात आल्यानंतर सुधारणेबाबत लेखी सूचना आणि पत्रसुद्धा त्यांनी शिक्षिकेला दिले. परंतु शिक्षिकेने त्यांच्यावर नको ते आरोप केल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. राजीनामा किंवा कारवाईया शिक्षिकेला कार्यपद्धतीबद्दल यापूर्वीच रीतसर नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारपासून शाळा बंदचा निर्णय विद्यार्थी-पालकांनी घेतला. परिणामी शिक्षिकेविरुध्द नियमसंगत कारवाई होणार असून दुसरीकडे सदर शिक्षिकाच राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद शमण्याची चिन्हे दिसत आहे.