शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांचा कर्जासाठी बँकेत ठिय्या

By admin | Updated: June 26, 2015 00:27 IST

शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्याकरिता येथील अलाहाबाद बँकेने ...

गोंधळ : वाढोणा येथील अलाहाबाद बँकेतील घटनामनीष कहाते वाढोणा रामनाथशेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्याकरिता येथील अलाहाबाद बँकेने गेल्या महिन्याभरापासून टाळाटाळ केल्याने गुरुवारी सुमारे २०० शेतकऱ्यांनी बँकेला घेराव घातला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन दिवसात कर्जपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गत तीन वर्षांपासून वाढोणा रामनाथ परिसरात नापिकी झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. परंतु येथील अलाहाबाद बँकेला कर्ज वाटपाचे कोणतेच आदेश नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी महिन्याभरापासून बँकेत कर्ज मिळण्याकरिता पायऱ्या झिजवित आहेत. परंतु बँक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. १७ जून रोजी येथील शेतकऱ्यांनी कर्ज वाटपासंदर्भात विनंती अर्ज दिला. परंतु बँक व्यवस्थापनाने अर्जाला केराची टोपली दाखविली. पैसे नसल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही पेरणी केली नाही. त्यामुळे सुमारे २०० शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अलाहाबाद बँकेत कर्ज मागणीचा प्रश्न रेटून धरला. संतप्त शेतकऱ्यांची बँक व्यवस्थापकांशी शाब्दीक चकमकही उडाली. बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला तर काही शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली.दोन दिवसात कर्ज वाटप करा, अन्यथा बँक चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी सुरेश गायधनी, सीताराम कंटाळे, प्रभाकर वाघमारे, रुपराव कटाळे, दीपक शहाडे, नितीन जकवार, गणेश शिरबहाद्दूरकर, विष्णू तिरमारे, सुनील येवले, मोहन इलमे, सुधीर शिंदे, चंपत बनारसे, पंजाबराव माटोडे, अरूण माटोडे, मनोज कुकडे, रामकृष्ण गायधनी, रामदास शहाडे, संजय मोटोडे, बाळासाहेब येवले यांनी दिला आहे.