शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर अवकळा, नागरिक हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:15 IST

शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता....

तक्रारींचा रतीब, दुरूस्ती नाही : न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम-पुष्पक कॉलनीवासीयांची व्यथाअमरावती : शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता या भागातील नागरिक किती बिकट अवस्थेत जीवन जगत आहेत, याची प्रचिती येते. या भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. नव्हे, रस्त्यांवर नुसते खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. याशिवाय इतरही समस्या आहेत. मात्र, महापालिकेकडे तक्रारींचा रतीब घालूनही कोणताच मार्ग निघत नसल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यानच्या काळात गडगडेश्वर प्रभागात डीपी मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून कोणत्याही रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील नागरिकांना विविध गरजांसाठी सातत्याने मध्यवस्तीत यावे लागते. परंतु येथील रस्त्यांची दुर्दशा बघता पायी वाहनांचे तर सोडाच, पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडलेत. महापालिकेला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे काय, असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. परिसरातील पथदिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे परिसरात असामाजिक तत्त्व सक्रिय असतात. परिणामी चोऱ्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. परिसरातील काही जागरूक नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे निवेदन, लेखी तक्रारी देऊन या भागातील समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी महापालिका प्रशासनाविरूद्ध सामान्य जनतेमध्ये रोष पसरला आहे. या भागातील डीपी मार्गाची तातडीने सुधारणा करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून गिरीधर गुल्हाने, मधुकर वडनेरकर, उमेश शेलोकार, रवि पोल्हाड, अतुल बोदडे, राजकुमार कनोजे, स्मिता डेरे, श्रीकृष्ण पळसकर, महेश पळसकर, सुरेश पोदार आदींसह शेकडो नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत परिसरातील खड्डेमय रस्ते, अंधार आणि इतर समस्यांमुळे या भागातून अन्यत्र ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. कित्येकदा विद्यार्थ्यांचे अपघातही होतात. त्यामुळे शाळेत अथवा ट्यूशनला गेलेला पाल्य परतेपर्यंत पालकांचा जीव टांगणीलाच राहतो.