शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता क्रीडा शिक्षकांनाही राज्य पुरस्कार

By admin | Updated: May 10, 2014 01:14 IST

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच आता राज्यातील क्रीडा शिक्षकांना राज्य शासनामार्फत पुरस्कार दिला जाणार आहे.

अमरावती : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच आता राज्यातील क्रीडा शिक्षकांना राज्य शासनामार्फत पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये दोन प्रकारचे पुरस्कार राहतील. राज्यस्तरावर रोख ५0 हजार तर जिल्हा स्तरावर १0 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा व राज्यस्तरावर एकूण ८६ पुरस्कार शिक्षकांना मिळणार आहेत.
क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार्‍या या पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मागील ३ वर्षांतील कामगिरी लक्षात घेतली जाईल. राज्यस्तरावर प्रत्येक विभागासाठी एक पुरुष आणि एक महिला याप्रमाणे आठ विभागांसाठी १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्हय़ात एक महिला, एक पुरुष याप्रमाणे ७0 पुरस्कार दिले जाईल. महापालिका असलेल्या जिल्ह्यांनाही महसूल जिल्हा क्षेत्रासाठी एक पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणार्‍या शिक्षकांने घडविलेले खेळाडू तसेच क्रीडाविषयक विकासात्मक कार्य हे संबंधित जिल्हय़ात असावे. एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन पुरस्कार मिळवल्याचे आढळल्यास पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. हा पुरस्कार दोन किंवा अधिक व्यक्तींना विभागाकडून दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी अपात्र शिक्षक आढळून आल्यास पुरस्कार रद्द केला जाईल. ७0 टक्के गुणांकन मिळविणार्‍यां हा पुरस्कार दिला जाईल. यात क्रीडा मार्गदर्शनातून घडवलेले खेळाडू विकासात्मक कार्य, क्रीडा प्रचार, तांत्रिक अधिकारी म्हणून केलेले कार्य गुणांकनासाठी पात्र राहतील. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष हे क्रीडामंत्री तर जिल्हा पुरस्कार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. (प्रतिनिधी)