शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत डायरिया, मलेरियाचा प्रकोप

By admin | Updated: September 11, 2014 23:12 IST

शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने जलजन्य विषाणुंमुळे रोगराई उत्पन्न झाली असून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्यरूग्ण विभाग तसेच प्रयोगशाळेसमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

श्यामकांत पाण्डेय - धारणीशहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने जलजन्य विषाणुंमुळे रोगराई उत्पन्न झाली असून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्यरूग्ण विभाग तसेच प्रयोगशाळेसमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. धारणी येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात १५० ते २०० रूग्णांची ओपीडीमध्ये नोंद होत असून सामान्य रूग्णांना उपचार करून सुटी दिली जात असली तरी रोज तापाने व डायरियाने ग्रस्त रूग्ण उपचारार्थ या रूग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रूग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. परिणामी एका पलंगावर दोन रूग्णांना झोपवावे लागत आहे. धारणीत २००३ मध्ये ५० खाटांच्या भव्य अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त उपजिल्हा रूग्णालयाचे उदघाटन गेल्या १२ जून रोजी पार पडले होते. या रूग्णालयात आॅपरेशन थिएटर, क्ष-किरण यंत्रणा, सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या अभावी या रूग्णालयात उपचार करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. काही डॉक्टरांच्या भरवशावर येथील आरोग्याचा डोलारा उभा असल्याचे दिसते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कुपनलिकांमधून अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. हेच गढूळ पाणी शुध्द न करता लोकांच्या घरात पोहोचत आहे. या पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे पावडर अथवा द्रव्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसू लागला आहे. दूषित पाण्यामुळे मलेरिया, डायरिया सारखे आजार तोंड वर काढू लागले आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कावीळची साथ पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.