शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

चालकाविनाच धावली एसटी!

By admin | Updated: June 18, 2014 23:53 IST

स्थानिक बसस्थानकावर १३ जून रोजी दुपारी १२ वाजता वरूडहून सावंगीला जाण्याकरिता थांबलेली बस काही वेळाने चालकाविनाच धावू लागली. या घटनेमुळे एसटीमधील प्रवासी भांबावून गेले.

वरूड स्थानकातील प्रकार : चालकांच्या समयसुचकतेमुळे टळला अनर्थवरुड : स्थानिक बसस्थानकावर १३ जून रोजी दुपारी १२ वाजता वरूडहून सावंगीला जाण्याकरिता थांबलेली बस काही वेळाने चालकाविनाच धावू लागली. या घटनेमुळे एसटीमधील प्रवासी भांबावून गेले. काही काळ बसस्थानकावर खळबळ उडाली. काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या घेतला. शेवटी मागे-मागे जाणारी ही एसटी आगाराच्या कंपाऊंडमधील पथदीव्याच्या खांबाला जाऊन धडकली आणि थांबली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.वरूडहून सावंगीला निघालेली ही एसटी चालकाने हॅन्डब्रेक लाऊन बंद अवस्थेत उभी केली होती. प्रवासी बसले होते. काही वेळाने आपोआपच बस मागे-मागे चालू लागली. गाडीत चालक नसल्याचे पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.चालत्या गाडीतून काही प्रवाशांनी एका पाठोपाठ एक उड्या घेतल्या. बसस्थानकामध्ये उपस्थित काही चालकांना हा प्रकार आढळून येताच त्यांनी गाडीत चढून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडी मागे सरकत जाऊन कम्पाऊंडमध्ये असलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर आदळल्याने संभाव्य अनर्थ टळला. चालती बस विद्युत खांबाला अडकली नसती तर सरळ नदीत जाऊन मोठा अपघात घडला असता किंवा प्रवाशांना अपघात होऊन प्राणहानी झाली असती. मात्र, काही चालकांच्या समयसुचकतेमुळे संभाव अनर्थ टळला. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. बसस्थानक परिसरात उपस्थित इतर चालकांनी प्रसंगावधान दाखविले नसते तर मोठा अपघात घडला असता, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती. (तालुका प्रतिनिधी)