शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे बोगस बियाणे उगवले नाही

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.

वरिष्ठांकडे तक्रार : नुकसान भरपाई देण्याची मागणी पूर्णानगर : येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र पेरणी केली असता ते सोयाबीन निघालेच नसल्याने हे शेतकरी झाले आहेत. या प्रकरणाचा तत्काळ तपास करुन बियाणे व पेरणी खर्च मिळवून द्यावा, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यानंतर झालेल्या तुरळक पावसात पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. यावेळी त्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ जातीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. १० दिवस उलटून गेल्यावरही बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी वर्ग पार खचून गेला आहे. आधीच पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी केली. परंतु बियाणे न उगवल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. या प्रकरणाची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषीविभाग, पंचायत समिती भातकुली, कृषी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, भातकुली तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शनिवारी अमरावती येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोगस बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहे. वरील तक्रारीची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी म्हस्के, महाबीज व्यवस्थापक देशमुख पं.स. अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी सुमित कृषी केंद्र पूर्णानगरमधून ५३३ बॅगांची विक्री झाली असून त्यापैकी १४६ शेतकऱ्यांनी बियाणे परत आणली आहेत. यावेळी त्यांनी काही शेतांची पाहणी केली असून याबाबतचा अहवाल आम्ही पाठविणार आहो, असे सांगून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. मागील दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांसमोर बोगस बियाण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन हे रोखीचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली. मात्र सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. गावागावतून तक्रारींचा पाऊस सुरु असून हजारो शेतकऱ्यांसमोर दुबार, तिबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे. तरी संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी व बियाणे तसेच पेरणीचा खर्च तत्काळ द्यावा अन्यथा पीडित शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व शासनाची राहील, असेही निवेदनातून कळविले आहे. सदर प्रकरणाचा तत्काळ तपास लावून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)