शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक लाख ३५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी

By admin | Updated: June 25, 2015 00:17 IST

जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. मंगळवार २४ जूनपर्यंत ७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन होते.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. मंगळवार २४ जूनपर्यंत ७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन होते. त्यापैकी सुमारे एक लाख ३५ हजार ०४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणीर् केली आहे. ही पेरणी १९ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनची ४६ हजार ५५ हेक्टरमध्ये तर तुरीची पेरणी १६ हजार ६६७ हेक्टरमध्ये झाली आहे. जिल्हतील चौदाही तालुक्यात पेरण्यांना वेग आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.यंदा जिल्ह्यात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यानुसार मंगळवारपर्यंत जिल्ह्यात खरीप पेरणीच्या कामाला बऱ्यापैकी वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवडयांमध्ये सर्वाधिक लागवड सोयाबीनची झाली असून त्यानंतर तुरीचा क्रमांक लागतो. आतापर्यत सुमारे ६ हजार २०१ हेक्टरमध्ये कपाशीची, २ हजार ८६० हेक्टरमध्ये ज्वारीची, २ हजार ४६२ हेक्टरमध्ये मुगाची, २ हजार ३४३ हेक्टरमध्ये धानाची, एक हजार ९५ हेक्टरमध्ये मक्याची तर उडिदाची ६३२ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्ह्यात सध्या खरिपाच्या पेरण्या करण्यात आला आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास सोयाबीनचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. काही वर्षांत अनियमित पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे उत्पादन घटले. कृषी विभागाने खत, बियाण्यांचे नियोजन केले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सवड मिळाली असून पेरणीच्या कामात ठिकठिकाणी शेतकरी व्यस्त असल्याचे दिसते. पावसाला पुन्हा सुरूवात होण्यापूर्वी शक्यतोवर पेरण्या आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसते.