शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषी पंपाचे निकष शिथिल

By admin | Updated: December 25, 2016 00:19 IST

शेतकऱ्यांना उपलब्धी ठरलेल्या सौर कृषिपंप योजनेचे निकष शिथिल केले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : १० एकरापर्यंत भूधारकांना सवलत अमरावती : शेतकऱ्यांना उपलब्धी ठरलेल्या सौर कृषिपंप योजनेचे निकष शिथिल केले आहेत. आता १० एकरापर्यंतच्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महावितरणच्या या योजनेचा जिल्ह्यात सध्या ५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये अमरावती तालुक्यात ४, भातकुली ७, चांदूररेल्वे ४, धामणगाव रेल्वे ४, नांदगाव खंडेश्वर ६, तिवसा १, अचलपूर २, चिखलदरा ३, दर्यापूर ७, चांदूरबाजार ८, मोर्शी ४ व वरूड तालुक्यात ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी शेतकऱ्याद्वारा सौर कृषिपंपाद्वारा सिंचनाचा लाभ घेत आहेत. या योजनेची आता व्याप्ती वाढविण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असा महावितरणचा प्रयास आहे. तीन अश्वशक्ती एसी पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापेक्षा कमी असल्यास लाभार्थी हिस्सा ५ टक्क्याप्रमाणे व आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापेक्षा जास्त असल्यास व १० एकरापेक्षा कमी असल्यास लाभार्थी हिस्सा हा ४८ हजार ६०० रुपये राहणार आहे. तीन अश्वशक्तीसह डी.पी. पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकराच्या आत असल्यास लाभार्थी हिस्सा २० हजार २५० रुपये व ५ एकरापेक्षा जास्त १० एकराच्या आत लाभार्थी हिस्सा असल्यास १५ टक्क्यांप्रमाणे ६० हजार ७५० रुपये लागणार आहे. ५ अश्वशक्ती ए. सी. पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापर्यंत असल्यास ५ टक्क्याप्रमाणे २७ हजार रुपये व जमिनीेची क्षेत्र ५ एकराच्यावर १० एकराच्या आत असल्यास १५ टक्क्याप्रमाणे ८१ हजार रुपये व ५ अश्वशक्ती डी. सी. पंपासाठी ५ एकरापर्यंत जमिनीचे क्षेत्र असल्यास ३३ हजार ७५० रूपये व १० एकरापर्यंत क्षेत्र असल्यास १५ टक्क्यांपर्यंत लाभार्थी हिस्सा असल्यास १ लाख १ हजार २५० रुपये राहणार आहे. ७.५ अश्वशक्ती ए. सी. पंपासाठी ५ एकरांपर्यंत क्षेत्र असल्यास ५ टक्क्याप्रमाणे ३६ हजार व १० एकराच्या आत क्षेत्र असल्यास १५ टक्क्याप्रमाणे १ लाख ८ हजार रुपये लाभार्थी हिस्सा राहणार आहे.