शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरपला

By admin | Updated: December 19, 2015 00:19 IST

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेत आहे.

विवाहाच्या पत्रिकाही व्हॉट्सअ‍ॅपवर : तरूणांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्षअमरावती : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आॅनलाईन संवाद साधला जात असल्याने प्रत्यक्ष भेट व यातून निर्माण होणारी मात्रा हरपली जात आहे. आता ग्रामीण भागातही इंटरनेट व एंड्राईड मोबाईल घराघरांत पोहोचले आहे. वॉट्सअ‍ॅपचे वेड तरूणाईला लागले आहे. अगदी १४-१५ वर्षांची मुलंदेखील स्मार्ट फोनच्या अधीन झाले आहे. या वयात शिक्षण, मैदानी खेळ याची गरज असताना व्हॉट्स अ‍ॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आता मुलांना आवर घालण्याची वेळ आलेली आहे. माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्किंगचा गरजेपेक्षा जास्त वापर होत आहे. विद्यार्थी व तरूणांना या गोष्टीचे व्यसन लागले आहे. काही वेळा याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहून आपला संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर होत आहे. स्मार्ट फोनच्या रूपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा अधिक वापर तरूण पिढी करीत आहे. मात्र यापेक्षा जास्त वापर होत असल्यास त्याचे तोटे अधिक आहे. (प्रतिनिधी)