तीन आरपीएफ शिपायांसह सहा संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:51+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा रविवारी प्राप्त ८० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये बुधवारा दहिसात परिसरात संक्रमित एका पोलीस कर्मचाºयाचे ५८ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. अंबागेट येथील ३४ वर्षीय तरुण हा वाहनाचे शोरुममध्ये काम करतो व हबीबनगर येथे ४५ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Six infected with three RPF soldiers | तीन आरपीएफ शिपायांसह सहा संक्रमित

तीन आरपीएफ शिपायांसह सहा संक्रमित

Next
ठळक मुद्दे‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील अन् एक होमगार्डही कोरोनाग्रस्त

अमरावती/बडनेरा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी सकाळी आणखी सहा अहवाल पॅझिटिव्ह आलेत. यामध्ये रेल्वे पोलीस दलाच्या तीन शिपायांसह शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या पोलीस शिपायांचे वडील व एक होमगार्ड व अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१८ वर पोहोचली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा रविवारी प्राप्त ८० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये बुधवारा दहिसात परिसरात संक्रमित एका पोलीस कर्मचाºयाचे ५८ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. अंबागेट येथील ३४ वर्षीय तरुण हा वाहनाचे शोरुममध्ये काम करतो व हबीबनगर येथे ४५ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरीक्त अन्य तीन हे रेल्वे पोलीस दलाचे शिपायी आहेत. ते श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये गस्तीवर होते. यांच्याच सोबतीला असणाºया आठ जवानांचे थ्रोट स्वॅबदेखील तपासणीसाठी घेण्यात आले होते. बारा बटालियन ठाकुर्ली मुंबईचे जवान ५ मे पासून आरपीएफ मुख्य कार्यालय नागपूर येथून श्रमिक ट्रेनच्या स्काटींगसाठी कार्यरत आहे. नागपूर ते बडनेरापर्यंत व काही वेळ आराम करून पुन्हा बडनेरा ते नागपूर, अशी गस्त या जवानांची होती. यातील तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या विश्रामगृहात काही दिवस थांबल्यानंतर या सर्वांना नव्यावस्तीच्या आरपीएफ कॉलनीतील क्वॉर्टर्स विश्राम करण्यासाठी देण्यात आले. या प्लाटूनमधील एक जवान नागपूरात पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातून या तिघांना लागण झाली की रेल्वे प्रवाशांमुळे हे आता तपासल्या जात आहे. बडनेºयाच्या आरपीएफ कार्यालयाशी यांचा संपर्क आला का, हेदेखील प्रशासनाला तपासणे गरजेचे आहे. आरपीएफ कॉलनी, रेल्वेस्थानक परिसर सॅनिटाईझ करण्यात आला.

तीन रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’
सद्यस्थितीत हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज भागातील ५० वर्षीय महिलेसह भातकुली येथील ५० वर्षीय पुरुष व लालखडी येथील १९ वर्षीय युवकाला रविवारी दुपारी कोरोनामुक्त करण्यात आले, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. या रुग्णांवर पहिले पाच दिवस औषधींचा कोर्स देण्यात आला. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवण्यात आले. या व्यक्तींमध्ये कुठलीही लक्षणे न दिसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले व त्यांना मिठाई देण्यात आली. या व्यक्ती आत सात दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. जिल्ह्यात १२० व्यक्तींना कोरोनामुक्त करण्यात आलेले आहे.

 

Web Title: Six infected with three RPF soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.