शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदावरुन आघाडीत ‘बिघाडी’चे संकेत

By admin | Updated: August 17, 2014 22:53 IST

महापालिकेत सत्तेची फळे चाखण्यासाठी समसमान पदे वाटपाच्या सुत्रानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करुन सत्ता काबिज केली. मागील अडीच वर्षांचा कार्यकाळ याच पार्श्वभूमीवर चालला.

विरोधकांचाही डोळा : कॉंग्रेस शब्द फिरवण्याच्या तयारीतअमरावती : महापालिकेत सत्तेची फळे चाखण्यासाठी समसमान पदे वाटपाच्या सुत्रानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करुन सत्ता काबिज केली. मागील अडीच वर्षांचा कार्यकाळ याच पार्श्वभूमीवर चालला. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन गटात विभागली गेल्याने या भांडणाचा लाभ घेण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतेमंडळींनी चालविला आहे. समसमान सत्ता वाटपाच्या सुत्रानुसार संभावित महापौर पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणे अपेक्षित आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राजकारण कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आ. सुलभा खोडके यांनी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सन- २०१२ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करताना रितसर करार केला. पाच वर्षांच्या सत्तावाटपाचे सुत्रे ठरविताना पहिले महापौर पद हे काँग्रेसच्या वाट्याला तर अडीच वर्षांनंतरचे दुसरे महापौर पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला देण्याचे ठरविण्यात आले. तसेच स्थायी समिती सभापती, झोन समिती सभापती आणि विशेष समित्या या समसमान वाटप करण्याचा करार या दोन्ही नेत्यांनी आपसात आघाडी करताना केला. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. परिणामी महापालिकेत राष्ट्रवादीची २३ सदस्य संख्या असलेल्यापैकी १० सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलेत. तर उर्वरित १३ सदस्य हे संजय खोडके यांच्याशी जुळून राहिलेत. हे १३ सदस्य अद्यापही खोडके यांच्या गटाशी एकनिष्ठ आहेत. मात्र राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेल्याने महापालिकेत गटनेते पदाचा वादही उफाळून आला आहे. राष्ट्रवादीने सुनील काळे यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीची घोषणेनेदेखील आमसभेत गदारोळात झाला होता. संजय खोडके गटाचे गटनेता म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या अपात्रतेचा मुद्दा आजही उच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे.सुनील काळे की अविनाश मार्डीकर यापैकी राष्ट्रवादीचा गटनेता कोण? या विषयाच्या प्रकरणाचा निकाल अद्यापही न्याय प्रविष्ठ आहे. एवढेच नव्हे तर चेतन पवार, मिलिंद बांबल, रिना नंदा व अविनाश मार्डीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या प्रकरणी अपात्रतेविषयीचा हा वादही न्यायालयात सुरु आहे.