शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा-अमरावती हा मुख्य मार्ग आहे.

ठळक मुद्देपरतवाडा शहरातही खड्डेच खड्डे : अपघात वाढले, अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा-अमरावती रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. चांदूर बाजार नाका ते आसेगावपर्यंत हे शेकडो जीवघेणे खड्डे बघायला मिळत आहेत.नाका-रणबाबा-भूगाव-मेघनाथपूर दरम्यान या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून उसळून खाली पडण्याचेही प्रमाण वाढले आहे. सहा महिन्यांपासून हे खड्डे बघायला मिळत आहेत.खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परतवाडा-अमरावती हा मुख्य मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी-नागरिकांची याच मार्गाने ये-जा आहे. तरीही हा रस्ता दुर्लक्षित आहे. अचलपूर तालुक्यात सामान्यांना अपेक्षित असलेली विकासकामे वेगाने व्हावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.चार कोटीचा खर्चपरतवाडा-अमरावती मार्गावर परतवाडा ते आसेगाव दरम्यान चार कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली. एवढ्या रकमेची कामेही त्या रस्त्यावर बघायला मिळत नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. आसेगावच्या पुलापासून तर दर्यापूर फाट्यापर्यंत झालेल्या कामात रस्त्याची एक बाजू तशीच अपूर्ण पडली आहे. त्यावरील डांबरीकरणाचा थरच गायब आहे. या रस्त्यावर आठ कोटींची कामे घेतल्याच्या दाखविण्याच्या प्रयत्नात बांधकाम विभाग आहे.कंत्राटदराने ते खड्डे बुजवावेत, याकरिता पाठपुरावा करीत आहोत. रस्त्यावर आठ कोटींचे काम प्रस्तावित आहे. चार कोटींचे काम पावसामुळे थांबविण्यात आले. अमरावती रोड व परतवाडा शहरातून जाणाऱ्या रस्त्याची देखभाल दोन स्वतंत्र कंत्राटदारांकडे दिली आहेत.- विजय वाट, उपविभागीय अभियंता, सां.बा.वि.नाक कापलेपरतवाडा शहरातून पुढे हाच रस्ता चिखलदरा, धारणीसह मध्य प्रदेश व अकोला-अकोटकडे जातो. या रस्त्यावर शहरातही जीवघेणे खड्डे पडले आहेत. जयस्तंभ आणि बैलजोडी चौक शहराचे नाक आहे. ते नाकच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी कापले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा