शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बुरखाधारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ४ डिसेंबर रोजी घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एक-दोन नव्हे, तब्बल २३ चोऱ्यांची कबुली या दोघांनी दिली.

ठळक मुद्दे२३ चोऱ्यांची कबुली : नवºयाच्या साथीने करीत होती घरफोड्या, दोघेही अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या ‘बुरखाधारी’ महिला चोराला तिच्या पतीसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी यश मिळविले. अमरावती येथील रहिवासी महिलेने नवºयाच्या साथीने केलेल्या २३ चोऱ्यांची कबुली आतापर्यंत दिली आहे. त्यां दोघांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस सूत्रांनुसार, सीमा ऊर्फ हेमा परवीन शेख नसीम (३५) व शेख नसीम शेख सलीम असे या चोर दाम्पत्याचे नाव आहे. ते अमरावती शहरातील हैदरपुरा येथे मद्रासीबाबा दर्ग्याजवळील सादीयानगरात राहतात. परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ४ डिसेंबर रोजी घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एक-दोन नव्हे, तब्बल २३ चोऱ्यांची कबुली या दोघांनी दिली. त्यांना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहायक उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, हेडकॉन्स्टेबल शेख शकूर, नायक पोलीस काँस्टेबल नितीन शेंडे, काँस्टेबल दिनेश कनोजिया, अमोल केंद्रे, सोनाली जवंजाळ, चालक अरविंद लोहकरे, अब्दुल सईद यांनी ही कारवाई केली.नोकरदारांच्या बंद घरांना हेरण्याची कामगिरी हेमा व शेख नसीम पार पाडत होते. त्यासाठी नैसर्गिक विधीसाठी सदर परिसरातून लोटा घेऊन ते फिरत असत. घर हेरल्यानंतर भरदिवसा घर फोडून ऐवज लंपास केला जात असे.येथे केली घरफोडीशेख नसीम व हेमा यांनी अंजनगाव सुर्जी, मोर्शी, शिरखेड, तळेगाव दशासर, तिवसा येथे प्रत्येकी एक, दर्यापुरात दोन, परतवाड्यात दोन, चांदूर बाजारात चार, वरूड शहरात पाच, तर दत्तापुरात पाच घरे फोडल्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे दिली. या सर्व घरफोड्या भरदिवसा झाल्या आहेत.१० लाखांचा मुद्देमाल जप्तसीमा व शेख नसीम यांच्याकडून १५० ग्रॅमचे ५ लाख ८२ हजारांचे दागिने, २७३.१३ ग्रॅमचे १३ हजारांचे दागिने, एमएच ०६ झेड ७७७७ क्रमांकाची तीन लाखांची चारचाकी, विना क्रमांकाची ८० हजारांची मोपेड, २० हजारांचे चार मोबाइल, २५०० रुपये रोख व घरफोडीसाठी वापरलेला पेचकच जप्त केला. हा मुद्देमाल ९ लाख ९७ हजार रुपयांचा आहे.

टॅग्स :Thiefचोर