शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या वर्षीही कोरोनाची ’लालपरीवर’ वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनांव्दारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी वारीने पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते एसटीने वारी करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी असते तसेच महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील दोन्ही एकादशीलादेखील जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला हजेरी लावतात.

ठळक मुद्देआषाढी वारी रद्द झाल्याने ४६ लाखांवर एसटीला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काही दिवसांवर आषाढी एकादशी असून, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परिणामी महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पांडुरंगाची वक्रदृष्टी कायम राहिल्याने एसटीला  ४६ लाखांवर हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनांव्दारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी वारीने पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते एसटीने वारी करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी असते तसेच महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील दोन्ही एकादशीलादेखील जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला हजेरी लावतात. वारकऱ्यांनकडून एसटीच्या विशेष सेवेला पसंती मिळत असते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे आषाढी वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य शासनाने एसटीने संतांच्या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. यात कौंडण्यपूर येथीलही पालखीचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्येही जिल्ह्यातून ५९ बसेसमधून २४५ फेऱ्याव्दारे १६,१४९ प्रवाशांनी वारी केली होती. त्यातून परिवहन महामंडळाला ४६ लाख ४७ हजार ९३९ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा एसटी महामंडळाला लाखो रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. दरम्यान, काही वर्षापासून परिवहन महामंडळ तोट्यात आहे. 

कोरोनाचाही फटका कोरोनाचा देखील मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एसटी महामंडळाची आर्थिक नुकसान होत आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अमरावतीतून पंढरपूर बस सेवा विस्कळीत झाली आहे. अशातच एक बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येत होती. मात्र, तिलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तिही बंद करण्यात आली आहे.- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या