शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा कर्मचाऱ्याला नागरिकांनी बदडले

By admin | Updated: October 15, 2015 00:09 IST

महिला व मुलींना बघून अश्लील अंगप्रदर्शन करणाऱ्या तखतमल प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्याला साईनगरातील नागरिकांनी बेदम चोप दिला...

अश्लील अंगप्रदर्शन : आरोपी ‘तखतमल’चा कर्मचारी अमरावती : महिला व मुलींना बघून अश्लील अंगप्रदर्शन करणाऱ्या तखतमल प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्याला साईनगरातील नागरिकांनी बेदम चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मनीष अनिल जोशी (१९, रा. पार्वतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. मनीष जोशी हा साईनगरातील तखतमल प्राथमिक स्कूलच्या वाहनावर वाहकपदी कार्यरत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनीष महाराष्ट्र बँक कॉलनी परिसरात उभा राहून तेथून ये-जा करणाऱ्या महिलांना पाहून अश्लील अंगप्रदर्शन करीत होता. त्याची हिंमत इतकी वाढली की, एका महिलेचा त्याने हातही पकडला. या घटनेनंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याला तखतमल स्कूलमध्ये नेले. तो याच शाळेतील कर्मचारी असल्याची शहानिशा करून त्याला राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी प्रशांत जाधव, स्वप्निल भागवत, पंकज वानखडे, वैभव ठाकरे, तुषार देशमुख, हेमंत अवघड, नकुल कराळे, पंकज पडोळे, रोहित देशमुख, राहुल बागडे यांच्यासह अनेक महिलादेखील उपस्थित होत्या. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ३५४ (अ),५०९ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मनीषचे शाळेतून पलायन मनीषला चोप देत तखलमल स्कूलच्या मुख्याध्यापकांकडे नेले असता शाळा व्यवस्थापन समितीने मनीषवर निलंबनाची कारवाई केली. त्यावेळी सर्व नागरिकांना शाळेच्या बाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते. कारवाईची प्रक्रिया संपल्यावरही मनीष शाळेतून बाहेर निघाला नाही. त्यामुळे नागरिक पुन्हा शाळेत शिरले. मात्र मनीष पसार झाल्याचे लक्षात आले. मनीषचा पुन्हा शोध घेण्यात आला. काही युवकांनी मनीषला पुन्हा पकडून पोलिसात दिले. प्रत्येक शाळेत पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समिती आहे. अशा प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येते. या प्रकरणातही चौकशी केली जाईल. - श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)तो वाहक महिलांसमोर अश्लील कृत्य करताना आढळून आला. असे प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केल्याच्याही तक्रारी शाळेकडे आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने असे प्रकार होतात. शाळेवरही कारवाई व्हायलाच हवी. - पंकज वानखडे,नागरिक, साईनगर. शाळेच्या वाहनावर कार्यरत वाहकाने महिलेची छेडखानी केल्याने नागरिकांना त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४(अ), ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. - एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.