शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शिक्क्याद्वारे गौण खनिजाची विक्री

By admin | Updated: January 23, 2017 00:01 IST

बनावट शिक्क्याद्वारे गौणखनिजांची चोरी-विक्री करणाऱ्या वाहनमालकांची टोळी जेरबंद करण्यात पोलीस, महसूल विभागाला यश आले आहे.

गुन्हे दाखल : नागरिकांची फसवणूक, शासनाचा महसूल बुडीतअमरावती : बनावट शिक्क्याद्वारे गौणखनिजांची चोरी-विक्री करणाऱ्या वाहनमालकांची टोळी जेरबंद करण्यात पोलीस, महसूल विभागाला यश आले आहे. मागील काही वर्षांपासूनहा प्रकार सुरू होता. नांदगाव पेठ पोलिसांनी दोन वाहन मालकांवर गुन्हे नोंदविले आहे.सम्राट सरोदे व गौरव ढवळी अशी गुन्हे दाखल झालेल्या वाहनमालकांची नावे आहेत. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पोलीस नागपूर महामार्गावर सिटीलॅण्डसमोर वाहनांची तपासणी करीत असताना गौणखनिज वाहतूक करणारी १० वाहने ताब्यात घेतली. वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर ही वाहने नांदगाव पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाला पत्र पाठवून वाहनांसह गौणखनिजांची जप्ती, पंचनामा करण्याचे कळविले. त्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. १३ ते १६ जानेवारी दरम्यान जप्ती पंचनामे, खदान मालकांकडून रॉयल्टी पासबूक, स्थळप्रत तपासण्यात आली. मात्र, रॉयल्टी पासबुक प्रत क्र. ११९२ व १३५५ स्थळप्रतीमध्ये तफावत आढळून आली. आठ वाहनांची मूळ कागदपत्रे व रॉयल्टी पासमध्ये तफावत नसल्याने ही वाहने मुक्त करण्यात आली. मात्र एम.एच.-१२, ई एफ- ८१००, एम.एच. ०४ डी.के- ४२८७ या दोन वाहनांमध्ये रॉयल्टी पासमध्ये खोडतोडीप्रकरणी वाहनमालकांचे बयाण नोंदविले. खदान मालकाकडून देण्यात येणाऱ्या रॉयल्टी पासवर उपलब्ध शिक्क्याद्वारे खोडतोड केल्याचे वाहनमालकांनी सांगितले. याआधारे वाहनमालकांकडून ७० हजार ९९२ रुपये दंड वसूल केला. मात्र महसूल विभागाच्या नियमानुसार गौण खनिजाची चोरी करणे, बनावट शिक्के बनवून गौणखनिजांची चोरी, अवैध गौणखनिज वाहतूक, शासन दस्तऐवजात हेराफेरी, शासनाची फसवणूक व गौणखनिज विकत घेणाऱ्यांची फसवणूकप्रकरणी भादंविच्या ४२०, ४६४, ४६५, व ४७१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.बनावट शिक्क ्याद्वारे शासनाचा महसूल बुडविला आहे. नागरिकांची फसवणूक देखील झाली आहे. वाहनमालकांच्या बयाणानुसार चौकशीअंती खदानमालकावरही गुन्हे दाखल करु.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती