शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अंबादेवी मंदिराच्या अंगारा पात्रात मेलेली पाल

By admin | Updated: May 5, 2017 00:08 IST

समोसा, कचोरी अथवा पॅकबंद पाकिटातील खाद्यपदार्थांमध्ये मृत पाली अथवा अळी आढळल्याच्या घटना उघडकीस येत असतानाच

 भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न : विश्वस्त, कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष अमरावती : समोसा, कचोरी अथवा पॅकबंद पाकिटातील खाद्यपदार्थांमध्ये मृत पाली अथवा अळी आढळल्याच्या घटना उघडकीस येत असतानाच अंबादेवी मंदिरातील अंगारा पात्रातही मृत पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रसिद्ध आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी मंदिरात हा प्रकार घडल्याने भाविकांच्या आरोग्याचा, विश्वसनीयतेचा आणि श्रद्धेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक संताजीनगर येथील रहिवासी संजय गुल्हाने यांचा २९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय हे सकाळी ७.१५ वाजता अंबादेवी मंदिरात सहकुटूंब दर्शनासाठी गेले. देवीचे दर्शन घेऊन दक्षिणा देण्यासाठी काऊन्टरवर पावती फाडत असताना त्यांची दोन मुले अंगारा घेण्यासाठी पात्राजवळ गेली. अंगारा हाती घेत असताना त्यांना पात्रात मृत पाल दिसली. मुलांनी ही माहिती वडिलांना दिली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अंगारा पात्रात पाल असल्याचे आढळताच संजय यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबद्ध केला. त्यानंतर ही माहिती त्यांनी दक्षिणा स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला दिली. या महिला कर्मचाऱ्याने अंगारा असलेल्या लोखंडी पात्रात पाल असल्याचे सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितले. पुन्हा पाल न दिसण्याची खात्री काय ? अमरावती : लगेच मंदिरात धावाधाव सुरू झाली. त्यानंतर अंबादेवी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही पाल बाहेर काढून अंगारा पात्र इतरत्र हलविले. मंदिरात भाविकांसाठी अंगारा पात्र लाडूविक्री होणाऱ्या केंद्राजवळ ठेवण्यात येत होते. मंदिरासारख्या पवित्रस्थळी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जात नसेल तर अन्य क्षेत्राचे काय, हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंदिरात भाविक हे मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. दर्शन घेऊन परतताना अंगारा जीभेवर किंवा कपाळावर लाऊनच बाहेर पडतात. मात्र, अंबादेवी मंदिरातील अंगारा पात्रात किती दिवसांपासून मृत पाल असावी, हा देखील चिंतनाचा विषय आहे. भाविकाला दिसली आणि त्याने तक्रार केली म्हणून ही पाल काढली गेली. यापुढे पुन्हा अंगाऱ्याच्या पात्रात पाल जाणार नाही, उंदरे फिरणार नाही, याची काय खात्री? (प्रतिनिधी)