शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या धाकाने महामार्गावरच टाकली रेती!

By admin | Updated: June 27, 2015 00:13 IST

मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान रेती घेऊन जाणाऱ्या टिप्पर चालकाने पुढ पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे ....

रेतीमाफियांची घाबरगुंडी : अनेक वाहनधारकांचे किरकोळ अपघात वरुड : मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान रेती घेऊन जाणाऱ्या टिप्पर चालकाने पुढ पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे पाहून चक्क राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालयासमोरच रेती टाकून पळ काढल्याची घटना घडली. परंतु या रेतीवरुन अंधारात वाहने जात असताना अनेकांना घसरून पडावे लागले, हे विशेष. प्रशासनाची यंत्रणा कूचकामी ठरल्याने अखेर नागरिकांनी रेती उचलून बाजूला ठेवल्याने संभाव्य अपघात टाळता आले. मध्यप्रदेशातून ओव्हरलोड रेतीची वाहतूक मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. याकरिता अनेकांनी तक्रारी केल्यात. मात्र, रेतीची वाहतूक सुरुच आहे. परंतु २३ जून रोजी महसूल विभागाने कारवाई करुन रेती वाहतूकदारांना सळो की पळो करुन सोडले होते. या कारवाईचा धसका घेऊन रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान मोर्शीकडे जाणाऱ्या एका रेतीच्या टिप्परने पोलिसांद्वारे टिप्परची तपासणी होत असल्याची माहिती माहिती मिळताच टिप्परमधील रेती राज्य महामार्गावर टाकून पळ काढला. या रेतीमुळे अनेक दुचाकीस्वार वाहनांसह घसरून पडलेत. यावेळी वरुडचे नगरसेवक तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला माहिती देऊन तातडीने उपायायोजना करण्याचे सुचविले. परंतु बांधकाम विभागाने ही बाब नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्याचे सांगितले. अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना माहिती देताच तहसीलदार बाळासाहेब तिडके घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत शिकलकरी मोहल्यातील नागरिकांनी रेती बाजूला केली. यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र एक तासानंतर घटनास्थली पोहोचले, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)