शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चौपदरीकरण, केबलिंग एकाचवेळी

By admin | Updated: March 23, 2015 00:25 IST

बडनेऱ्यातील पोलीस ठाणे ते टी-पॉर्इंटपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण व वीज वितरण कंपनीचे केबलिंगचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

लोकमत विशेषश्यामकांत सहस्त्रभोजने  अमरावतीबडनेऱ्यातील पोलीस ठाणे ते टी-पॉर्इंटपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण व वीज वितरण कंपनीचे केबलिंगचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हा मार्ग वर्दळीचा असल्याने कामाला गती देण्याची मागणी पुढे येत आहे. मागील दोन महिन्यांपासून नव्यावस्तीतून जाणाऱ्या महामार्गावर पोलीस ठाण्यापासून ते यवतमाळ टी-पॉर्इंटपर्यंतच्या अर्धा किलोमीटर अंतराच्या चौपदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अकोला, यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. दरम्यान एवढ्याच भागात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बसस्थानकदेखील याच मार्गावर आहे. खासगी वाहन पार्किंग याच परिसरात होत असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. दोन महिन्यांपासून या मार्गावर दुभाजक बसविण्याचे काम सुरू आहे. या दुभाजकांमुळे दोनही बाजूने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे केबल काढण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता बराच मोठा रस्ता खोदण्यात आला आहे. ही सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. एकाचवेळी केबलिंगचे काम व चौपदीकरणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही दोन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे केली जात असल्याची माहिती आहे. या मार्गावरील सततच्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर दुभाजक लावल्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत असल्याची ओरड वाहनचालकांची आहे. अपघाताचा धोका वाढलापोलीस ठाणे ते यवतमाळ टी-पॉर्इंटपर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे याचवेळी वीज वितरण कंपनीचे केबल काढण्याचे कामही सुरू आहे. या दोनही कामांमुळे या भागात अपघातांचा धोका वाढला आहे. नियोजनचा अभाव असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. कामात नियोजन आणून कामाला गती देण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे. अशाच पध्दतीने कामकाज सूरू राहिल्यास मोठा अपघात घडू शकतो.