शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना मिळणार जंगलात हक्काचा वाटा

By admin | Updated: June 22, 2014 23:48 IST

वनक्षेत्रातील गावांना जंगलाचे काही क्षेत्र चरितार्थासाठी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम कायद्यानुसार वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संबंधित

महत्त्वाकांक्षी निर्णय : नैसर्गिक वनसंपदेची विक्री करण्याची परवानगीअमरावती : वनक्षेत्रातील गावांना जंगलाचे काही क्षेत्र चरितार्थासाठी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम कायद्यानुसार वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संबंधित गावांना नैसर्गिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे सुटणार असला तरी यापुढे जंगलांच्या संरक्षणाची जबाबदारीसुध्दा स्थानिकांवर राहणार आहे. पूर्वीपासून अनेक गावांचा उदरनिर्वाह जंगलांवर अवलंबून आहे. मात्र, भारतीय वनअधिनियम कायदा १९२७ नुसार स्थानिक रहिवाशांना जंगलातील वस्तू परवानगीशिवाय घेता येत नाहीत. जळतण आणि जनावरांसाठी गवत घेण्याचा अधिकार नाही. मागील काही वर्षांत जंगलाचे आगीपासून संरक्षण करणे आणि वनक्षेत्र वाढविण्यासाठी गावांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील गावांना वनांचा काही भाग चरितार्थासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम शासन आदेश मार्च २०१४ नुसार ग्रामस्थांना जंगलातील काही भागांचा उपयोग करता येईल. यासाठी जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रालगतच्या प्रत्येकी एका गावाची निवड केली जाईल. या लाभासाठी संबंधित गावाने चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि शिकारबंदी ठराव पारित करणे आवश्यक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित गावाला जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्राप्त असावा आणि गेल्या तीन वर्षांत जंगलात आगीची घटना घडलेली नसावी, अशी अट यासाठी टाकण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामवन घोषित केल्यास तातडीने जंगलाचा काही भाग गावकऱ्यांना दिला जाईल. या कामासाठी गावात वनव्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल. समितीतील वनविभागाचे कर्मचारी तांत्रिक मार्गदर्शन करतील. गावकऱ्यांना जंगलातून बिबा, करवंद, चारोळी, गवत आणि फळांची विक्री करता येणार आहे. या उत्पन्नातील काही भाग जंगल आणि गावाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. लवकरच हा निर्णय काही निवडक गावांना लागू होणार आहे.