शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी सुकलेल्या रोपट्यांना नवजीवन

By admin | Updated: August 20, 2014 23:15 IST

२० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे

वडाळी नर्सरीचे सौंदर्यात भर : वृक्ष संवर्धनाला मदतअमरावती : २० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील वृक्ष संवर्धनाला मदत मिळाली आहे. गेल्या २२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष संवर्धनाची कुणकुण जाणवत होती. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याने हजारो रोपट्यांना पाण्याची आवश्यकता होती. गेल्या २२ दिवसांपासून वृक्षारोपणात लावलेली रोपटी पाण्याविना तग धरुन होते. अशीच परिस्थिती वडाळीतील नर्सरीमध्येही पाहायला मिळाली. वडाळी वनपरिक्षेत्रामध्ये विविध प्रजातीच्या १ लाख वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. या रोपट्यांना जगविण्यासाठी विशेष सोय वडाळीतील नर्सरीमध्ये करण्यात आली आहे. निम, बांबू, साग, चिकू, पिंपळ, निलगिरी अशा विविध प्रजातींच्या सुमारे १ लाख रोपट्यांचे रोपन वडाळीत करण्यात आले आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये पाऊस न पडल्याने रोपटे जगतील का असा प्रश्न वनविभागासमोर होता. मात्र मंगळवारी बरसलेल्या पावसामुळे रोपट्यांना संजीवनी मिळाली आहे. वडाळीचे नक्षत्र वन हिरवळीने बहरले आहे.