शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला स्थगिती

By admin | Updated: July 8, 2014 23:14 IST

राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षणाच्या निर्णयामुळे मात्र जिल्हा परिषदेत चालू जुलै महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती.

अमरावती : राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षणाच्या निर्णयामुळे मात्र जिल्हा परिषदेत चालू जुलै महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र या आरक्षणाचे धोरण स्पष्ट झाले नसल्याने नव्या आरक्षणाच्यानुसार नोकरभरती करण्याचे धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांची जुलै महिन्यात होणारी नोकरभरती शासनाने काही दिवस स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी येत्या काही दिवसात नोकरभरती घेण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने चौदाही विभागातील रिक्त असलेली विविध पदे भरण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाकडून माहितीही मागितली होती. ही माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. यानुसार आरक्षणाच्या आधारित वर्गवारीनुसार नोकरभरतीची प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. या नोकरभरतीबाबत जाहिरात काढून उमेदवारांकडून रितसर अर्जही मागवितले जाणार होते. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच जिल्हा परिषदेची ही नोकरभरती लेखी परीक्षेद्वारे पूर्ण करण्याचीही राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले होते. मात्र राज्य शासनाने नुकतेच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल्यामुळे या नव्या आरक्षणाच्या निर्णयानुसार नोकरभरतीत सदर प्रवर्गाचे आरक्षण समाविष्ट करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये होत असलेली नोकरभरती नव्या आरक्षणाच्या निर्णयामुळे तूर्तास स्थगित करण्याबाबतचे लेखी आदेश सर्वच जिल्हा परिषदांना ५ जुलै रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची ही नोकरभरती स्थगित करण्यात आली असून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत नोकरभरती होणार नाही. (प्रतिनिधी)